The Family Man Season 3 : 'द फॅमिली मॅन 3' बाबत समोर आली मोठी अपडेट, मनोज वाजपेयी कोणत्या मिशनवर असणार?
The Family Man Season 3 Updates : गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या या वेब सीरिजला लोकांनी चांगलीच पसंती दिली. या वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत.आता तिसरा सीझन येणार आहे.
The Family Man Season 3 Updates : अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) प्रमुख भूमिका असलेली अॅमेझॉन प्राईमवरील'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज चांगलीच गाजली होती. गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या या वेब सीरिजला लोकांनी चांगलीच पसंती दिली. या वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत.आता तिसरा सीझन येणार आहे. या वेब सीरिजशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मनोज वाजपेयीचे चाहते 'द फॅमिली मॅन 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'द फॅमिली मॅन 3' साठी निर्माते बरीच तयारी करत असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. आता या मालिकेच्या रिलीज तारखेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज आणि कृष्ण डीके अनेकदा या वेब सीरिजशी संबंधित माहिती चाहत्यांना देत असतात. 'द फॅमिली मॅन'चे शूटिंग ईशान्य भागात होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. 'पीटीआय' बोलताना डीके यांनी सांगितले की, द फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनमध्ये वेगवेगळे मुद्दे हाताळण्यात आले होते. पहिल्या भागात काश्मीर, दहशतवादाशी संबंधित मुद्दा होता. तर, दुसऱ्या सीझनमध्ये तामिळनाडू आणि श्रीलंकेतील तामिळ फुटीर चळवळीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. तिसऱ्या सीझनमध्ये आम्ही आणखी एका मुद्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, हा मुद्दा काय असणार हे आताच सांगणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द फॅमिली मॅन 3' साठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वेब सीरिज यावर्षी रिलीज होणार नाही. 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो. मात्र, वेब सीरिजच्या रिलीजबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर दिसले होते. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू दिसली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.