The Family Man 2 Trailer : मनोज वाजपेयींच्या अभिनयाचा साज असलेला 'द फॅमिली मॅन 2' लवकरच रसिकांच्या भेटीला; ट्रेलर प्रदर्शित
The Family Man 2 Trailer : 'द फॅमिली मॅन 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच आज सीझनचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला.

The Family Man 2 Trailer : मनोज वाजपेयी अभिनीत मोस्ट अवेटेड वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहते गेल्या बऱ्याच दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहत होते. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. ट्रेलरबाबत बोलायचं झालं तर पुन्हा एकदा मनोज वाजपेयी यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धमाकेदार अभिनयानं ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयींवरुन नजर हटवणं अवघड झालंय. ट्रेलर रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी सीरीज 4 जून 2021 रोजी रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
'द फॅमिली मॅन 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. सीरीजच्या पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहते दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत होते. आजा या सीझनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहून चाहते आता सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्मात्यांनी 'द फॅमिली मॅन 2' फेब्रुवारीमध्ये रिलीज न केल्याबाबत निर्मात्यांनी निराशा व्यक्त केली होती. तसेच यंदाच्या समर सीझनमध्ये सीझन रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.
पाहा 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर :
दरम्यान, 'द फॅमिली मॅन 2' मधून दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनी डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिरीजमध्ये मनोज वाजपेयीसोबत, प्रियामणी, यांच्यासोबत शरिब हाश्मी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. तसेच तमिळ चित्रपटसृष्टीमधील मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल देखील दिसून येणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
