एक्स्प्लोर

'आता मनोरंजन क्षेत्रातही आत्महत्या होतील' तिकडे चित्रिकरण चालतं.. मग आपल्याकडे का नाही : अभिजीत पानसे

मला वाटतं राज्य सरकारने लवकर काही पावलं उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांपाठोपाठ मनोरंजनक्षेत्रातही आत्महत्या होऊ लागतील.

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चित्रिकरण बंद आहे. इकडे बंद होतं म्हणून सगळे निर्माते आधी गोव्यात आणि पुढे दमण, सिल्वासा इथे गेली. गेल्या महिन्याभरापासून तिथे चित्रिकरणं चालू आहेत. तिथे जर परमिशन मिळते तर त्याच नियमाने महाराष्ट्रातही चित्रिकरण करायला काय हरकत आहे? असा सवाल दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे यांनी विचारला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटमधूनही सांस्कृतिक खात्याला चित्रिकरण सुरू करण्यासंदर्भत विनंती केली होती.

सध्या मराठी, हिंदी मालिकांचं चित्रिकरण सिल्वासा, उंबरगाव, दमण इथं चालू आहे. बायोबबलचा वापर करून या मालिकांचं चित्रिकरण करण्यात येतं आहे. गेल्या महिन्याभरापासून ही चित्रिकरणं चालू आहेत. गोव्याचा अपवाद वगळता तिथे कुणालाच काही अडचण आलेली नाही. यावरून बोलताना अभिजीत पानसे म्हणाले, 'मनसे मार्फत आम्ही सातत्याने मदत करतो आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही रंगमंच कामगारांनाही अन्नधान्य वाटप केलं. त्यावेळी त्यांची स्थिती भयानक असल्याचं लक्षात आलं. मला वाटतं राज्य सरकारने लवकर काही पावलं उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांपाठोपाठ मनोरंजनक्षेत्रातही आत्महत्या होऊ लागतील. त्यांची स्थिती बिकट आहे. अशावेळी राज्यात चित्रिकरणाचा पर्यय सुरू करता येईल. बायोबबल महाराष्ट्रात तर अगदीच होऊ शकतो. चित्रिकरण होऊ शकतील. राहता येईल. डिस्टन्स पाळता येईल अशी अनेक रेसॉर्ट राज्यात आहेत. तिथे त्यांना परवानगी दिली तर कामगारांचा प्रश्न मार्गी लागेल. शिवाय, सिल्वासा, दमण आदी भागापेक्षा आपल्याकडे नक्कीच जास्त सुविधा आहेत.'

सध्या रंगमंच कामगारांचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. याबद्दल अभिजीत म्हणाले, हाताला काम मिळालं की गोष्टी मार्गी लागतात. चित्रिकरण आपण बंद केलं आहे. पण बाकीची सगळी कामं लोक करत आहेतच. मुंबईच्या रस्त्यावर बघितलं तरी होणारी गर्दी लक्षात येते. अशावेळी बायोबबल चा पर्याय मुंबई आणि मुंबई बाहेर ठेवला तर त्या मंडळींना सोपं होईल. बॅकस्टेज आर्टिस्ट काम करू शकतील. शक्य असेल तर नाटकाच्या रंगमंच कामगारांनाही तिकडे सामावून घेता येतं का ते पाहता येईल. आज प्रत्येकजण घरी बसून एंटरटेन्मेंट पाहातो आहे. मग ते कोणतेही ओटीटी असोत. अशावेळी राज्य सरकारने याचा विचार करून चित्रिकरणाला परवानगी द्यावी.'

सर्वसाधारणपणे चित्रिकरण सुरू असलेल्या ठिकाणी सर्वत्र कोरोनाची काळजी घेतली जातेय. जिथे घेतली जातेय. तिथे चित्रिकरणं नीट सुरू आहेत. अनेक लोके परराज्यात जाऊन सुखरूप आलेसुद्धा. जर तिकडे बायोबबल क्रिएट होऊ शकतो तर तो इकडेही होऊच शकतो. शिवाय, यातून ज्या रिसॉर्टमध्ये चित्रिकरणं चालू आहेत, तिथे त्यांचं अर्थचक्र काही प्रमाणात सुरू होईल. यातून रोजगार महाराष्ट्रालाच मिळणार आहे, असंही, पानसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget