एक्स्प्लोर

'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत

Tharala Tar Mag Star Pravah Marathi Serial Track: सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलींसारखा जपलाय. त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झालेत आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिलेत.

Tharala Tar Mag Star Pravah Marathi Serial Track: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'ठरलं तर मग' मालिकेनं (Tharala Tar Mag Marathi Serial) प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळतोय. सायली आणि अर्जुनचा प्रवास प्रेक्षकांनी आपल्या घरातील मुला-मुलींसारखा जपलाय. त्यांच्या प्रत्येक आनंदात प्रेक्षक सहभागी झालेत आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत भावनिकरित्या उभे राहिलेत. आता प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेत एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेला प्रोमो पाहुन प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. 

'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत सर्वात मोठं आणि धक्कादायक वळण येणार आहे. बाळाच्या आगमनाची आनंदमयी तयारी सुरू असतानाच सायलीच्या आयुष्यात वादळ येणार आहे. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात पोलीस येऊन सायलीला अटक करणार आहेत. अनाथाश्रमातील मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. आनंदाच्या क्षणात घडणारी ही अनपेक्षित घटना अर्जुन आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणार आहे. 

'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारा ट्वीस्ट (Tharala Tar Mag Marathi Serial Tweest)

धक्कादायक ट्विस्टची झलक दाखवणाऱ्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही तासांतच प्रोमोनं 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. 350 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. सायलीच्या पाठीशी उभे राहत प्रेक्षकांनी तिच्यासाठी न्यायाची मागणी केली आहे आणि पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'ठरलं तर मग मालिकेला चार वर्ष पूर्ण होतील. या चार वर्षात प्रेक्षकांची साथ मोलाची होती. मालिकेतली एखादी गोष्ट आवडली तर प्रेक्षकांनी पाठ थोपटली. कधी चुकलो तर हक्कानं कान पिळले. मालिकेचा पुढचा प्रवास आता अधिक रंजक होणार आहे. डोहाळ जेवणाच्या दिवशी सायलीला अटक होण्याच्या प्रोमोला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला हे पाहून खूप भारावून गेलेत. प्रेक्षकांना एकच आवाहन आहे अशीच सोबत द्या, अशी भावना जुई गडकरीनं व्यक्त केली आहे.

मात्र, सायली इतक्यात हार मानणाऱ्यांपैकी नाही. स्वतः वरील खोटे आरोप दूर करून सत्य जगासमोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार आहे. कारण आई होणारी स्त्री केवळ नव्या जीवाला जन्म देत नाही, तर आपल्या बाळाच्या भविष्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्याचं बळही तिच्यात असतं. एक आई आपल्या मुलासाठी कोणत्याही वादळाशी दोन हात करू शकते. सायलीचाही हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्याकरता आणि सत्याच्या विजयासाठी असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget