GOAT Record Breaking Deal: थलापती विजयच्या 'या' चित्रपटाने रिलीज आधीच कमावले 200 कोटी, रचला नवा विक्रम
GOAT OTT Record Breaking Deal: राजकारणात येण्यापूर्वी हा विजयचा दुसरा शेवटचा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच 'गोट' (GOAT) बाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
GOAT OTT Record Breaking Deal: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयचा (Thalapathy Vijay) 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आणखी तीन महिन्यांहून अधिक कालावधी बाकी आहे. परंतु या चित्रपटाने ट्रेड सर्कलमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी हा विजयचा दुसरा शेवटचा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच 'गोट' (GOAT) बाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बंपर कमाई करेल अशी आशा निर्मात्यांना आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ओटीटी डीलचे अपडेट्स समोर आले आहेत आणि गोटने रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
OTT वर कुठे रिलीज होणार गोट? (GOAT OTT Release)
थलपथी विजयच्या द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग ओटीटी करार केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे आणि त्याआधी नेटफ्लिक्सने गॉटचे ओटीटी अधिकार खरेदी केले आहेत. या चित्रपटाचे बजेट प्रचंड असल्याचे वृत्त आहे.
View this post on Instagram
OTT वर GOAT ची डील किती रुपयांना? (GOAT OTT Deal)
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा वेंकट प्रभू दिग्दर्शित थलपथी विजयचा 68 वा चित्रपट आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार, राजकारणात पूर्णपणे प्रवेश करण्यापूर्वी थलापती विजय आता त्याचे दोन चित्रपट पूर्ण करणार आहे. ओटीटी डीलबद्दल बोलायचे झाले तर नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 125 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. ट्रॅक टॉलीवूडच्या वृत्तानुसार, या डीलमधून निर्मात्यांना 110 कोटी रुपये मिळाले असून ही मोठी रक्कम आहे.
सॅटेलाइट्स राइट्सची डील कितींना? (GOAT Satellite Rights Deal)
ओटीटीसोबतच गोटचे सॅटेलाइट हक्कही विकले गेले आहेत. झी नेटवर्कने 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम'चे सॅटेलाइट्स राइट्स विकत घेतले आहेत. यामध्ये सर्व भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. या डीलमधून निर्मात्यांना 90 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे बोलले जात आहे. या दोन डीलमधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच 200 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे.
चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होईल (GOAT release Date)
'गोट' हा थलपथी विजयचा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात विजय दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'मध्ये प्रशांत, प्रभू देवा, स्नेहा, मीनाक्षी चौधरी, जयराम, योगी बाबू इत्यादी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे संगीत युवा शंकर राजा यांनी दिले आहे. गोट 5 सप्टेंबर 2024 रोजी OTT वर रिलीज होणार आहे.