Telly Masala : नागराजच्या वेब सीरिजमध्ये सई ताम्हणकर झळकणार ते जुनैदच्या 'महाराज'च्या अडचणी वाढल्या, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sai Tamhankar Nagraj Manjule : सईची स्वप्नपूर्वी! नागराज मंजुळेच्या वेब सीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
Sai Tamhankar Nagraj Manjule : बॉलिवूड, हिंदी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आता पुन्हा एकदा हिंदीतील मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सई ताम्हणकर आता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule ) 'मटका किंग' (Matka King) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. अभिनेता विजय वर्मा हा लीड रोलमध्ये असणार आहे. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. त्यात 'मटका किंग'ची ही घोषणा करण्यात आली होती. 'मटका किंग' असलेल्या रतन खत्री याच्या आयुष्यावर ही वेब सीरिज बेतली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Drashti Dhami Announce Pregnancy : लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात सुखाचा क्षण, चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार, 38 व्या वर्षी आई होणार
Drashti Dhami Announce Pregnancy : छोट्या पडद्यावर 'मधुबाला' (Madhubala) या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दृष्टी धामीने गुड न्यूज दिली आहे. दृष्टी धामीने (Drashti Dhami) आपण आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी धामी गरोदर असून 38 व्या वर्षी आई होणार आहे. दृष्टी धामीने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Alyad Palyad Marathi Movie Review : अल्याड-पल्याड: खिळवून ठेवणारा रहस्याचा खेळ, वाचा रिव्ह्यू
Alyad Palyad Marathi Movie Review : हॉरर-कॉमेडीपट असलेला 'अल्याड-पल्याड' चित्रपट प्रेक्षकांना रहस्याच्या खेळात गुंतवून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...
Sushant Singh Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी अंकिता लोखंडेची खास पोस्ट, बहीण म्हणाली, ''मी हरलीये.."
Sushant Singh Rajput Death Anniversary : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतसारख्या कलाकाराने टोकाचा निर्णय घेतल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. सुशांतच्या स्मृतीदिनी त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, अंकिता लोखंडे आणि सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने खास पोस्ट लिहिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Marathi Serial Updates Drama Juniors: 'ड्रामा ज्युनियर्स'च्या ऑन एअरची वेळ ठरली, 'झी मराठी'वरील कोणत्या मालिकेची बदलणार वेळ?
Marathi Serial Updates Drama Juniors Zee Marathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका येत आहेत. या नवीन मालिकांसाठी जुन्या मालिकांच्या वेळा बदलण्यात येत आहे अथवा त्यांना निरोप दिला जात आहे. झी मराठीवर (Zee Marathi) आता 'ड्रामा ज्युनियर्स' (Drama Juniors) हा नवा रिएल्टी शो येत आहे. लहान मुलांचा अभिनय कौशल्य पाहणारा हा रिएल्टी शो आता 22 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ड्रामा ज्युनियर्स'साठी कोणत्या मालिकेची वेळ बदलण्यात येणार याची चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Junaid Khan debut film Maharaj : जुनैदच्या 'महाराज'च्या अडचणी वाढल्या, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती
Junaid Khan Debut Film Maharaj : आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याचं बॉलिवूड पदार्पण लांबले आहे. जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या (Maharaj) रिलीजला गुजरात हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. या चित्रपटात झुनैद महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. अहमदाबाद आणि मुंबईत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहमदाबादमध्ये वैष्णव पंथाच्या अनुयांनीदेखील याचिका दाखल केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...