एक्स्प्लोर

Telly Masala : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित चैतन्य बाहेर काढणार? अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा ते रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'; ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tharla Tar Mag : ' कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित चैतन्य बाहेर काढणार? अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा

 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. साक्षीमुळे चैतन्य आणि अर्जुनमध्ये सध्या बरेच वाद आहेत. त्यांच्यात सतत सुरु असलेले हे वाद मिटवण्याचा प्रयत्न सध्या सायली करतेय. पण साक्षी काही केल्या चैतन्य आणि अर्जुनमधले हे वाद मिटू देत नसल्याचं पाहायला मिळतंय. चैतन्य आणि अर्जुनची मैत्री ही मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती. दोघांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सांगतात. अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य अजूनही चैतन्यकडे आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या वादात चैतन्य हे सत्य बाहेर काढणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिलीये. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Manohar Joshi : दोन दिवसांपूर्वीच कास्टिंग, कधीही भेट नाही, वा बोलणंही नाही; तरिही रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'

Manohar Joshi In Movie :  बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक,  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसैनिकांचे सर असलेले मनोहर जोशी (Manohar Joshi Passed Away) यांचे निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेचा आक्रमक चेहरा असतानाही मनोहर जोशी यांचे शांत व्यक्तीमत्त्व ठळकपणे दिसून येत होते. त्यांचे हे व्यक्तीमत्व रुपेरी पडद्यावर दिसून आले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Tom Cruise : वयाच्या 61व्या वर्षी टॉम क्रूझचं ब्रेकअप; 25 वर्षांनी लहान प्रेयसीसोबतचं नातं तुटलं

हॉलिवूडचा स्टार अभिनेता टॉम क्रूझच्या (Tom Cruise) वैयक्तिक आयुष्यात मोठी घडामोड झाली आहे. 61 व्या वर्षी टॉम क्रूझचे प्रेमप्रकरण संपुष्टात आले आहे. टॉम क्रूझ आणि  त्याची रशियन प्रेयसी एल्सिना खैरोवाचे (Elsina Khayrova) ब्रेकअप झाले असल्याचे वृत्त आहे.  टॉमने 10 दिवसांपूर्वीच आपल्या रिलेशनशिपची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्याचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Hruta Durgule and Ajinkya Raut : छोट्या पडद्यानंतर हृता - अजिंक्यचा रोमँटीक अंदाज मोठ्या पडद्यावर, 'कन्नी' सिनेमा लवकरच भेटीला येणार

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही अनेक सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हृता ही नुकतीच झी मराठी वाहिनीवरील 'मन उडु उडु झालं' या मालिकेत झळकली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि तिची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. छोट्या पडद्यावर या रॉमँटीक जोडीने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हीच जोडी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीचा कन्नी हा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Lakshmichya Pavalani : राहुल नयनाला सोडणार अर्ध्या वाटेवर, चांदेकरांच्या घरात कलाच्या आईवर चोरीचा आरोप, नात्यांना कोणतं नवं वळण मिळणार?

 स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Pavlani) या मालिकेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडामोडी घडत आहे. नयनाने उचललेल्या पावलामुळे खरे आणि चांदेकरांच्या घरात ताणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कला चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी गेली खरी पण तिला सुनेचा दर्जा मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेला अल्पावधीच प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच खरे आणि चांदेकरांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार आणि नात्यांची परीक्षा घेणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Nilesh Sable : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला निरोप, निलेश साबळे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, ओटीटीवरही ठेवणार पाऊल

 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आणि त्यांना खळखळून हसवत निलेश साबळेने (Nilesh Sable) या कार्यक्रमाची धुरा देखील सांभाळली. पण तो आता या कार्यक्रमाला निरोप देणार आहे. तसेच एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं निलेशने एबीपी माझासोबत बातचीत करताना सांगितलं.  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे. पण निलेश आता हा कार्यक्रम सोडणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छाTop 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget