एक्स्प्लोर

Nilesh Sable : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला निरोप, निलेश साबळे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, ओटीटीवरही ठेवणार पाऊल

Nilesh Sable : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घरोघरी पोहचलेला निलेश साबळे हा लवकरच आता मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

Nilesh Sable : 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आणि त्यांना खळखळून हसवत निलेश साबळेने (Nilesh Sable) या कार्यक्रमाची धुरा देखील सांभाळली. पण तो आता या कार्यक्रमाला निरोप देणार आहे. तसेच एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं निलेशने एबीपी माझासोबत बातचीत करताना सांगितलं.  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे. पण निलेश आता हा कार्यक्रम सोडणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. 

काही आठवड्यांपूर्वीच या कार्यक्रमातून बाहेर पडला असल्याचं देखील यावेळी निलेशने म्हटलं. तसेच सध्या नवा सिनेमा आणि नव्या वेब सिरिजचं देखील काम चालू आहे. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय अडचणी असल्याचं निलेशने म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काही काळामध्ये निलेश मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्याच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल. सध्या एका वेब सिरिजचं देखील काम सुरु असल्याचं निलेशने सांगितलंय. त्यामुळे निलेश लवकरच ओटीटी माध्यमावर पाऊल ठेवणार आहे. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवं नक्की घेऊन येईन, प्रेक्षकांनी आजपर्यंत जे अनुभवलं त्यापेक्षाही अधिक छान असं काम असेल, असं देखील निलेशने एबीपी माझाला सांगितलं. 

'चला हवा येऊ द्या' बंद होणार असल्याच्या चर्चा

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला भाग 2014 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमाने बाजी मारली. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. पण काही दिवसांपासून टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. डॉ. निलेश साबळेप्रमाणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि स्नेहल शिदम (Snehal Shidam), सिद्धेश शिंदे (Siddhesh Shinde) हे कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. 

'असा' होता डॉ. निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या'पर्यंतचा प्रवास (Nilesh Sable Details)

डॉ. निलेश साबळेच्या करिअरमध्ये 'झी मराठी' (Zee Marathi), 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा आहे. निलेश साबळे व्यावसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. पण लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नक्कल करण्याची आवड निर्माण झाली. पुढे झी मराठीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमाचा विजेता होत त्याने आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली. 'होम मिनिस्टर', 'फू बाई फू' या कार्यक्रमांचंही त्याने सूत्रसंचालन केलं. पुढे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने त्याला चांगलाच ब्रेक मिळाला.

ही बातमी वाचा :

'कॅप्टन ऑफ द शीप' जहाज सोडणार! 'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळे बाहेर पडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 Headlines  टॉप 100 हेडलाईन्स बातम्या : 08 PM : 12 May 2024  ABP MajhaRaj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेमRaj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget