Tharla Tar Mag : ' कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित चैतन्य बाहेर काढणार? अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा
Tharla Tar Mag : अर्जुन आणि सायलीच्या नात्याची सुरुवात ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने झाली होती. पण त्यांचं हे सत्य आता चैतन्य बाहेर काढणार हे पाहवं लागणार आहे.
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या चैतन्य आणि अर्जुनच्या मैत्रीत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. साक्षीमुळे चैतन्य आणि अर्जुनमध्ये सध्या बरेच वाद आहेत. त्यांच्यात सतत सुरु असलेले हे वाद मिटवण्याचा प्रयत्न सध्या सायली करतेय. पण साक्षी काही केल्या चैतन्य आणि अर्जुनमधले हे वाद मिटू देत नसल्याचं पाहायला मिळतंय. चैतन्य आणि अर्जुनची मैत्री ही मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती. दोघांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सांगतात. अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य अजूनही चैतन्यकडे आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या वादात चैतन्य हे सत्य बाहेर काढणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिलीये.
अर्जुन आणि सायलीच्या नात्याची सुरुवात ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने झाली होती. पण सहवासाने अर्जुनला सायलीवरच्या प्रेमाची जाणीव झाली. अर्जुनला जेव्हा सायलीवरच्या प्रेमाची जाणीव झाली तेव्हा ही गोष्ट त्य़ाला सर्वात आधी चैतन्यला सांगायची होती. त्यावेळी अर्जन चैतन्यच्या घरी गेला पण त्याच्यासमोर साक्षी आणि चैतन्यच्या नात्याचं सत्य आलं. वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये साक्षीवर आरोप करण्यात आलेत. तिच्यावर चैतन्यचं प्रेम असल्याचं अर्जुनला समजलं आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली.
चैतन्य अर्जुनचं गुपित बाहेर काढणार
पुन्हा एकदा अर्जुनच्या ऑफीसमध्ये चैतन्य आणि त्याच्यामध्ये वाद होतात. त्यावेळी अर्जुन चैतन्याला मैत्रीवरुन चार शब्द ऐकवतो. त्यावेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो की, मित्र तोच असतो जो आपल्या मित्राची प्रत्येक सिक्रेट्स जीवापाड जपतो. असंच तुंझही एक सिक्रेट फक्त माझ्याकडेच आहे, असं चैतन्य अर्जुनला म्हणतो.
अर्जुन आणि सायलीच्या नात्याची परीक्षा
अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजपासून मालिकेची कथा सुरु झाली. सायलीने अर्जुसोबतचं लग्न जरी कॉन्ट्रॅक्टचं असलं तरीही आता त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं आहे. पण सायलीला अजूनही पुर्णा आज्जांनी स्विकारलं नाही. त्यामुळे जर त्यांच्या या नात्याचं सत्य जर का चैतन्यमुळे बाहेर आलं तर सुभेदारांच्या घरी कोणतं नवं वादळ येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच जर हे सत्य चैतन्यने साक्षीला सांगितलं तर साक्षी आणि प्रिया मिळून याचा फायदा घेणार का हे देखील येत्या काही भागांमध्ये कळेल.