एक्स्प्लोर

Telly Masala : 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'पंचायत 3' ची रिलीज डेट जाहीर;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Panchayat Season 3 release Date : 'पंचायत 3' ची रिलीज डेट अखेर जाहीर; 'या' दिवशी भेटायला येणार फुलेरा गावचे सचिवजी!

Panchayat Season 3 Release Date :   बहुप्रतिक्षीत वेब सीरिज 'पंचायत 3' ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून (Prime Video) 'पंचायत 3'च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. त्यानंतर आज रिलीज डेटवरून पडदा उघडण्यात आला आहे. त्यामुळे फुलेरा गावातील मंडळींना भेटण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Shah Rukh Khan : संजय दत्तऐवजी शाहरुख असता 'मुन्नाभाई', त्या एका गोष्टीने...; मकरंद देशपांडेने सांगितला किस्सा

Shah rukh Khan Munna Bhai MBBS :  बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आपली छाप सोडतात. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munna Bhai MBBS) या चित्रपटानेदेखील आपली छाप सोडली. संजय दत्त (Sanjay Dutt) आणि  अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या मुन्नाभाई आणि सर्किट या व्यक्तीरेखा तुफान लोकप्रिय ठरल्या. आजही संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना याच व्यक्तीरेखांच्या नावाने ओळखले जाते. मु्न्नाभाईची भूमिका ही शाहरुख खान (Shah rukh Khan) साकारणार होता.  तर, सर्किटचा रोल हा मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) साकारणार होता. मात्र, शाहरुखने आपल्या अडचणीमुळे नकार दिला आणि हा चित्रपट त्याच्या हातातून निसटला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Serial Updates : 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर कमबॅक; मालिकेचा प्रोमो आऊट

Marathi Serial Updates  Abir Gulal Serial :  'तुला पाहते रे'  (Tula Pahate Re) ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले. सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, आशुतोष गोखले, सोनल पवार, गार्गी फुले, संदेश जाधव आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी गायत्री दातार (Gayatri Datar) आता मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. गायत्री दातार आता कलर्स मराठीच्या 'अबीर गुलाल' (Abir Gulal Serial) मालिकेत दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Pankaj Tripathi : हातात महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तरीही पंकज त्रिपाठींनी घेतला ब्रेक; समोर आलं महत्त्वाचं कारण

Pankaj Tripathi : मागील काही वर्षांपासून चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा अभिनेता पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) नाव कमावले आहे. पंकज त्रिपाठींकडे सध्या काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. असे असतानाही त्यांनी आता कामातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठी चित्रीकरणात नसणार आहे. पंकज त्रिपाठी यांनी  ब्रेक घेण्याचेही कारण समोर आले आहे. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने त्यांनी कुटुंबाला अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Premachi Goshta Serial Update : कार्तिकला तुरुंगात टाकलं, मुक्तावर स्वाती करणार विषप्रयोग! आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. मुक्ता आणि सागरमधील गैरसमज कमी होणार आहेत. तर, दुसरीकडे कार्तिकला तुरुंगात टाकलं म्हणून स्वाती आता मुक्तावर विषप्रयोग करणार आहे. मुक्ताला स्वातीचा कट कळणार का, सावनी पुन्हा एकदा सागरच्या संसारात माती कालवणार का , असे अनेक प्रश्न आता निर्माण होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.