Pankaj Tripathi : हातात महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तरीही पंकज त्रिपाठींनी घेतला ब्रेक; समोर आलं महत्त्वाचं कारण
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींकडे सध्या काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. असे असतानाही त्यांनी आता कामातून ब्रेक घेतला आहे. त्यांनी ब्रेक घेण्याचेही कारण समोर आले आहे.
Pankaj Tripathi : मागील काही वर्षांपासून चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा अभिनेता पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) नाव कमावले आहे. पंकज त्रिपाठींकडे सध्या काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. असे असतानाही त्यांनी आता कामातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पंकज त्रिपाठी चित्रीकरणात नसणार आहे. पंकज त्रिपाठी यांनी ब्रेक घेण्याचेही कारण समोर आले आहे. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असल्याने त्यांनी कुटुंबाला अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
काही दिवसांपूर्वी पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचे अपघाती निधन झाले होते. या अपघातात पंकज त्रिपाठी यांची बहीण गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर पंकज त्रिपाठी यांनाही धक्का बसला आहे. घरात शोकाकूल वातावरण असल्याने पंकज त्रिपाठी यांनी आपल्या कुटुंबाला प्राथमिकता दिली असून त्यांच्यासोबत वेळ घालवत आहेत.
जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्यांची बहीण आणि मेहुणा पंकज त्रिपाठीचे शूटिंग पाहण्यासाठी गेले होते अशी चर्चा होती. मात्र, या दाव्यांचे खंडन करताना, सूत्राने 'हिंदुस्तान टाईम्स'ला सांगितले की, घटनेच्या वेळी पंकज त्रिपाठी हे त्यांच्या गावी होते. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे.
कुटुंबासोबत आहेत पंकज त्रिपाठी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या घटनेच्या वेळी पंकज त्रिपाठी हे सुट्टीसाठी आपल्या गावी होते. कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करत नव्हते. अपघातानंतर कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी पंकज त्रिपाठी हे पूर्णवेळ कुटुंबासोबत आहे.
लवकरच मुंबईत परतणार
पंकज त्रिपाठी हे लवकरच मुंबईत परतणार असून चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. दिग्दर्शक अनुराग बसू यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर ते काम करत आहेत. त्याशिवाय एका वेब सीरिजमध्येही झळकणार असल्याची माहिती आहे.
झारखंडमध्ये झाला होता अपघात....
20 एप्रिल रोजी झारखंडमध्ये पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. धनबादच्या सिरसा येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंकज त्रिपाठी यांची बहीण आणि तिची दोन मुलेही जखमी झाली आहेत.