एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : संजय दत्तऐवजी शाहरुख असता 'मुन्नाभाई', त्या एका गोष्टीने...; मकरंद देशपांडेने सांगितला किस्सा

Shah rukh Khan Munna Bhai MBBS : मुन्नाभाईची भूमिका ही शाहरुख खान साकारणार होता. तर, सर्किटचा रोल हा मकरंद देशपांडे साकारणार होता. शाहरुखच्या वाटेची भूमिका ही संजय दत्तला गेली.

Shah rukh Khan Munna Bhai MBBS :  बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आपली छाप सोडतात. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munna Bhai MBBS) या चित्रपटानेदेखील आपली छाप सोडली. संजय दत्त (Sanjay Dutt) आणि  अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या मुन्नाभाई आणि सर्किट या व्यक्तीरेखा तुफान लोकप्रिय ठरल्या. आजही संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना याच व्यक्तीरेखांच्या नावाने ओळखले जाते. मु्न्नाभाईची भूमिका ही शाहरुख खान (Shah rukh Khan) साकारणार होता.  तर, सर्किटचा रोल हा मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) साकारणार होता. मात्र, शाहरुखने आपल्या अडचणीमुळे नकार दिला आणि हा चित्रपट त्याच्या हातातून निसटला. 

अभिनेता मकरंद देशपांडे यांनी याबाबतचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला. सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत मकरंद देशपांडेने पडद्यावर न साकारलेल्या मुन्नाभाईच्या भूमिकेबाबत सांगितले. मकरंद देशपांडे यांनी याआधी शाहरुखसोबत स्वदेश चित्रपटात काम केले होते. 

...तर शाहरुख असता मुन्नाभाई... 

मुन्ना भाई एमबीबीएस'बद्दल मकरंद देशपांडे यांनी सांगितले की, 'मला राजूने (राजकुमार हिरानी) फोन केला. मला आठवते की मी काही दृश्यांवर काम केले होते. मी कदाचित काही इम्प्रोवाइज केले होते. एक गाणं देखील रेकोर्ड केले होते. त्यामध्ये माझा आवाज होता. याआधी शाहरुख खान 'मुन्ना भाई...'मध्ये काम करणार होता, पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो हा चित्रपट करू शकला नाही. त्यानंतर संजय दत्त आला असल्याचे मकरंद देशपांडे यांनी सांगितले. 

मकरंद देशपांडे यांनी चित्रपट का सोडला?

मकरंद देशपांडे यांना 'मुन्ना भाई एमबीबीएस' का सोडला, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मकरंदने म्हटले की, शूटिंगच्या तारखा मला मिळायच्या तेव्हा मला भीती वाटायची. चित्रपटाच्या तारखा आल्या तेव्हा राजूने माझ्याकडे 56 दिवस मागितले. हे माझ्यादृष्टीने चुकीची बाब होती. माझ्या आयुष्यात मला नेहमीच एक गोष्ट माहीत आहे की माझा वेळ माझ्यासाठी मौल्यवान आहे आणि मला कोण भूमिका देत आहे आणि कोणती भूमिका देत आहे. किंवा त्या भूमिकेतून मला काय फायदा होईल? तुम्हाला प्रसिद्धी, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळेल की नाही? हा माझ्यासाठी कधीच प्रश्न पडला नाही.

'मंकी मॅन' मध्ये  मकरंद देशपांडे
 
मकरंद देशपांडे रंगभूमीवर चांगलेच सक्रिय आहेत. मकरंद देशपांडे सध्या देव पटेलच्या मंकी मॅन चित्रपटात झळकले आहेत. हा चित्रपट सध्या भारतात रिलीज झाला नाही. या चित्रपटात सिकंदर खेर आणि शोभिता धुलिपालच्या भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget