एक्स्प्लोर

Telly Masala : 'निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडून देईन', कंगना रणौतची मोठी घोषणा ते शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर हेमंत ढोमेची भावूक पोस्ट ;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kangana Ranaut : 'निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडून देईन', कंगना रणौतची मोठी घोषणा; राजकारणातच स्वत:ला झोकून देणार

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपची (BJP) उमेदवार आहे. तिला भाजपने तिची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातूनच उमेदवारी दिली आहे. सध्या कंगना ही तिच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार करतेय. त्यामुळे ती ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय. पण याच दरम्यान कंगनाने देखील एक मोठी घोषणा केली आहे. कंगना निवडणूक जिंकली तर ती काय करणार असा प्रचार कंगनाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय. त्यावर आता कंगनाने सडेतोड उत्तर दिलंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Hemant Dhome : 'साहेब स्वतःची काळजी घ्या, तब्बेत जपा...', शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर हेमंत ढोमेची भावूक पोस्ट 

 पक्षात फूट पडल्यानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि लोकसभेची निवडणूक हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. त्यातच शरद पवार (Sharad Pawar) हे देखील स्वत:च्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान हे शेवटच्या काही टप्प्यात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यासाठी शरद पवारांची बारामतीमध्ये सांगता सभा देखील पार पडली. पण त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेची (Hemant Dhome) पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Panchayat 4 Big Update: जिथे 'पंचायत-3' संपणार तिथूनच 'पंचायत-4' ची गोष्ट सुरु होणार? समोर आली मोठी अपडेट

काही वर्षांपूर्वी आलेल्या 'पंचायत' (Panchayat) ही सिरिज अनेकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे जेव्हा कधी बेस्ट सिरिजचा उल्लेख केला जातो, तेव्हा पंचायतचं नाव आवर्जुन घेतलं जातं. या सिरिजशी सामन्य माणसं खूप कनेक्ट झालीत. या सिरिजमध्ये उत्तर प्रदेशातील फुलेरा गावाची गोष्ट दाखवण्यात आलीये. पंचायत या सीरिजचा पहिला पार्ट हा 2020 मध्ये आला होता. त्यानंतर 2022 मध्ये या सीरिजचा दुसरा पार्ट आला. आता 28 मे रोजी 'पंचायत-3' (Panchayat Season 3 Release Date) रिलीज होणार आहे. प्राईमवर (Amazon Prime Video) ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी पंचायत-4 विषयी देखील मोठी अपडेट समोर आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sanju Rathod : जगभरात गाजलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं लिहिणारा संजू राठोड आहे तरी कोण? इंजिनीअरिंगचा अभ्यास करताना गवसली संगीताची वाट 

'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. अगदी सामान्यांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींना देखील या गाण्याची भुरळ पडली. इतकच नव्हे तर मराठी फिल्मफेअरच्या मंचावर देखील हे गाणं सादर करण्यात आलं. पण या गाण्यासोबतच एक प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला. तो म्हणजे हे गाणं लिहिणारा संजू राठोड (Sanju Rathod) नेमका आहे तरी कोण? दरम्यान संजूने नुकतची 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या सांगितीक प्रवासाचा उलगडा केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Akshay Indikar : मुंबईत मराठी माणूस चालणार नाही? 'त्या' व्हायरल पोस्टवर मराठी दिग्दर्शकाची संतप्त प्रतिक्रिया; कंपनीच्या एचआरकडून पोस्ट डिलीट 

'आपुल्या घरात हाल सोसते मराठी...'सुरेश भटांची ही रचना आठवण्याचं कारण म्हणजे संताप आणणारी एक जॉबसंदर्भातली पोस्ट. एका सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये, असं चीड आणणारं वाक्य लिहिलं होतं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्या दक्षिण मुंबईतील गिरगांव भागाची ओळख चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसासाठी आहे. त्याच मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव (Girgaon) भागातील एका नोकरीसंदर्भातली ही जाहिरात होती. ज्यामध्ये मराठी माणसाने अर्ज करु नये. असं डोक्यात तिडीक जाणारं वाक्य नमूद केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळासह मराठी सिनेसृष्टीहीने यावर तीव्र संताप व्यक्त केला. नुकतच दिग्दर्शक अक्षय इंडिकर (Akshay Indikar) याने देखल ही पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली. पाहता पाहता सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आणि संबंधित कंपनीला आपण केलेल्या घोडचुकीचा साक्षात्कार झाला. त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिलीय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Samantha Ruth Prabhu : सामंथा प्रभूकडून चुकून तो प्रायव्हेट फोटो पोस्ट? सोशल मीडियावर चाहते म्हणाले...

 अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आपल्या अभिनयासह खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत असते. सामंथा प्रभू ही  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या नव्या प्रोजेक्टची माहिती देण्यासह ती चाहत्यांसोबत संवादही साधते. मायसोइटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या सामंथावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता सामंथा पुन्हा एकदा चर्चेत आली  आहे. सामंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चुकून नको तो फोटो शेअर केला. त्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर काही वेळेतच तो फोटो डिलीट करण्यात आला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Titanic Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक'च्या 'कॅप्टन ऑफ द शीप'चे निधन; अभिनेता बर्नार्ड हिल यांनी घेतला अखेरचा श्वास, हॉलिवूडमध्ये हळहळ

 'टायटॅनिक' आणि 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेते बर्नार्ड हिल (Bernard Hill Dies) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड हिल यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री आणि बर्नार्ड हिलची को-स्टार बार्बरा डिक्सन हिने ही माहिती दिली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीकाAkhil Chitre Join Shiv Sena UBT | 18 वर्ष पक्षात राहूनही अखिल चित्रेंनी मनसेला केला रामराम! ठाकरे गटात प्रवेश, म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
Embed widget