Telly Masala : रितेश देशमुखचे ओटीटीवर पदार्पण ते अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sonu Nigam Asha Bhosle: Video :भरमंचावर सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतले, काय झालं नेमकं?
Sonu Nigam Asha Bhosle : जगद्विख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावरील या 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी गायक सोनू निगम याने भरमंचावर स्वरसम्राज्ञी असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुत पाद्य पूजन केले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Ashish Shelar Asha Bhosle : आशिष शेलारांनी 'ती' आठवण सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले
Ashish Shelar Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काही प्रसंग सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Actress Hina Khan Health Updates : 'कोमोलिका'ला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; तिसऱ्या स्टेजवर आहे, उपचार सुरू असल्याची अभिनेत्रीची माहिती
Actress Hina Khan Health Updates : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिच्या प्रकृती बाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता, स्वत: हिना खानने (Hina Khan Health Updates) आपल्या प्रकृतीबाबत चाहत्यांना अपडेट दिली आहे. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून उपचार सुरू असल्याची माहिती तिने दिली आहे. हिना खानने 'कसौटी जिंदगी की -2' या मालिकेत कोमलिका ही खलनायकी भूमिका साकारली होती.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Anant Radhika Wedding : लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग, नीता अंबानींनी खरेदी केली खास साडी, किंमत किती?
Anant Ambani Radhika Merchant Wedding : ग्रँड प्री-वेडिंग फंक्शननंतर आता अंबानी कुटुंबात अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या (Anant Ambani Radhika Merchant Wedding) तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका काशी विश्वनाथाच्या चरणी ठेवली. आपल्या वाराणसीच्या दौऱ्यात नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आपल्या लेकाच्या लग्नासाठी साड्यांची खरेदी केली आहे. नीता अंबानी यांनी जवळपास 60 साड्या खरेदी केल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
एकेकाळी रद्दी विकून चालवलं घर, आज लाखोंमध्ये मानधन घेते ही चिमुरडी, कोट्यवधीमध्ये आहे संपत्ती
Divyanka Tripathi Networth : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची नावे आणि पात्र प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहेत. प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत या अभिनेत्रींना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. यातील बहुतांशी अभिनेत्रींना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला.