एक्स्प्लोर

Actress Hina Khan Health Updates :  'कोमोलिका'ला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; तिसऱ्या स्टेजवर आहे, उपचार सुरू असल्याची अभिनेत्रीची माहिती

Actress Hina Khan Health Updates :  अभिनेत्री हिना खान हिच्या प्रकृती बाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता,  स्वत: हिना खानने आपल्या प्रकृतीबाबत चाहत्यांना अपडेट दिली आहे

Actress Hina Khan Health Updates :  छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिच्या प्रकृती बाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता,  स्वत: हिना खानने (Hina Khan Health Updates) आपल्या प्रकृतीबाबत चाहत्यांना अपडेट दिली आहे. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून उपचार सुरू असल्याची माहिती तिने दिली आहे. हिना खानने 'कसौटी जिंदगी की -2' या मालिकेत कोमलिका ही खलनायकी भूमिका साकारली होती. 

हिना खानने काय सांगितले?

अभिनेत्री हिना खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत काही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सत्य माहिती मीच सांगण्याचा निर्णय घेतला आहे. मला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली असून तिसऱ्या स्टेजवर आहे, असे हिनाने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

हिना खानने म्हटले की, मी हिनोहोलिक्स आणि ज्यांना माझी काळजी वाटतेय अशा सर्वांसोबत महत्त्वाची माहिती शेअर करू इच्छिते. मला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यानंतरही मी ठीक असल्याचे सांगू इच्छिते. मी स्ट्राँग आहे, कणखर असून या आजाराला मात देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्यामुळे मी आणखी मजबूत होण्यासाठी, आजाराला मात देण्यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचे हिना खानने सांगितले. 

मूळची जम्मू-काश्मीरमधील असलेली हिना खान हीने सोनी टीव्हीवरील 'इंडियन आयडॉल' या गाण्याच्या रिएल्टी शोमध्ये 2008 मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी ती 'टॉप 30 ' स्पर्धकांमध्ये होती.  अभिनेत्री हिना खानने स्टार प्लस वाहिनीवरील  'ये रिश्ता क्या कहलाता है'  या मालिकेत अक्षरा आणि 'कसौटी जिंदगी की 2' मधील कोमोलिका ही व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकांमुळे ती लोकप्रिय झाली. त्यानंतर 2017 मध्ये हिना खानने  'फिअर फॅक्टर:खतरो के खिलाडी 8' आणि 'बिग बॉस 11' या रिएल्टी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिने काही मालिकांमध्ये कमी कालावधीसाठी छोट्या भूमिका साकारल्या.  हिना खानने नागीन सारख्या सुपरनॅच्युअरल शोमध्ये काम केले होते.  

इतर महत्त्वाची बातमी: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीकाABP Majha Headlines : 10 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 09 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget