एक्स्प्लोर

Telly Masala : अनंत-राधिकाच्या राजेशाही लग्नसोहळ्याची बातच न्यारी! ते किरण मानेंनी जागवल्या निळू फुलेंसोबतच्या आठवणी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Anant Ambani - Radhika Merchant Wedding : जगभरातील वऱ्हाडींची मांदियाळी, सासऱ्यांसोबत सुनेची एन्ट्री; अनंत-राधिकाच्या राजेशाही लग्नसोहळ्याची बातच न्यारी!

 जगभरातील दिग्गजांच्या मांदियाळीने सजलेला मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. शुक्रवार 12 जुलै रोजी अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला सिनेसृष्टी, क्रिडाविश्व, बडे उद्योगपती, राजकीय नेते या सगळ्यांनी उपस्थिती लावली. जवळपास संपूर्ण बॉलीवूड या सोहळ्यासाठी उपस्थित होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Nilu Phule : 'मोठा माणूस'! छोटासा सहवास पण या 'महान' अभिनेत्यानं 'जगणं' शिकवलं; किरण मानेंनी जागवल्या निळू फुलेंसोबतच्या आठवणी

 मराठी कलाकारासांठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी निळू फुले (Nilu Phule) हे नाव कायमच खास राहिलं आहे. मराठी सिनेमा, नाटकं यामध्ये विविधांगी भूमिका अगदी सहज पेलण्याचं आव्हान ते लिलया पार पाडायचे. म्हणूनच मराठी सिनेमामधल्या या खलनायकासाठी थिएटर्स अगदी हाऊसफुल्ल व्हायचे. पत्रकार,लोककलावंत अशा अनेक व्यक्तिरेखा निळूभाऊंनी अगदी अजरामर केल्या आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांसाठी निळू फुले हे नाव कायमच खास ठरतं. 13 जुलै रोजी त्यांना जाऊन 15 वर्ष होत आहेत. त्याचनिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी खास पोस्ट लिहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Madhuri Dixit : माधुरीनं वरमाईसोबत धरला ठेका तर रितेश-जनेलियाच्या एन्ट्रीची चर्चा; अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या वऱ्हाडींचा भन्नाट डान्स

 अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नामध्ये अनेक मराठमोळ्या दिग्गजांनी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर या वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच ठेका धरला. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) अनंत अंबानींच्या वरातीमध्ये थिरकताना दिसले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही व्हिडीओ बरेच चर्चेत आले आहेत. अनंत राधिकाच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलीवूड उपस्थित राहिलं होतं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Marathi Actor : 'अली बाबा त्याचे 40 चोर, शिनचॅन, हेच काय ते उरलेत...', अंबानींच्या लग्नात जॉन सीनाच्या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट 

सध्या जगभरात एका सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा शुक्रवार 12 जुलै रोजी पार पडला. या सोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनेकांच्या उपस्थितीच्या जोरदार चर्चा देखील रंगल्या आहेत. पण त्या सोहळ्यात एक एन्ट्री मात्र खास ठरली. WWE गाजवणाऱ्या जॉन सीनाला (John Cena) देखील या सोहळ्याचं आमंत्रण होतं. त्यामुळे त्याने देखील उपस्थिती लावली होती. त्याच्या या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Anant-Radhika Honeymoon: स्वित्झर्लंड, साऊथ आफ्रिका की आणखी काही, अनंत-राधिका Honeymoonसाठी कुठे जाणार? चर्चांना उधाण

 मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा लग्नसोहळा अगदी राजेशाही थाटात पार पडला. अनंत (Anant Ambani) आणि राधिका (Radhika Merchant) शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. पण शनिवार आणि रविवार हे दोन दिवसही त्यांच्या लग्नानंतरचे काही सोहळे पार पडणार आहेत. शनिवार 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि रविवार 14 जुलै रोजी रिसेप्शन पार पडणार आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हे जोडपं हनीमूनला कुठे जाणार याची जोरदार चर्चा सुरु सध्या सुरु झाली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget