Madhuri Dixit : माधुरीनं वरमाईसोबत धरला ठेका तर रितेश-जनेलियाच्या एन्ट्रीची चर्चा; अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या वऱ्हाडींचा भन्नाट डान्स
Anant Ambani- Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
Anant Ambani- Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नामध्ये अनेक मराठमोळ्या दिग्गजांनी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर या वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच ठेका धरला. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) अनंत अंबानींच्या वरातीमध्ये थिरकताना दिसले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही व्हिडीओ बरेच चर्चेत आले आहेत. अनंत राधिकाच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलीवूड उपस्थित राहिलं होतं.
नुकताच अनंत अंबानीच्या वरातीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अंबानी कुटुंबासह संपूर्ण बॉलीवूड थिरकत होतं. अगदी रजनीकांत, अनील कपूर यांच्यासह अनेकांनी या लग्नात ठेका धरला. पण माधुरीच्या डान्सने साऱ्यांच विशेष लक्ष वेधून घेतलं. त्याचप्रमाणे या वरातीमध्ये रितेशने ठेका धरला. रितेश आणि जेनिलियाने लग्नमंडपात नाचत नाचतच एन्ट्री केली.
माधुरीने नीता अंबानींसोबत धरला ठेका
माधुरीने वरमाई नीता अंबानींसोबत ठेका धरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचप्रमाणे रितेश आणि जेनिलियाची एन्ट्रीच हटके झाली. त्यामुळे अनंत अंबानीची वरात सेलिब्रेटींनी अगदी गाजवून टाकल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या या वरातीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर होत आहेत.
View this post on Instagram
बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
लग्नाच्या पाहुण्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार डान्स केला. रेसलर जॉन सीना, रणवीर सिंह, संजय दत्त, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांनी भरपूर डान्स केला. आई नीता अंबानी यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला. रात्री 9.30 वाजता लगन, सात फेरे आणि सिंदूर दानाचा विधी पार पडले.
राधिका आणि अनंत यांचा विवाहसोहळा तीन दिवस पार पडणार आहे. 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी बीकेसीमधील जिओ सेंटर येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक बडे नेते वधु-वरांस आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.