Marathi Actor : 'अली बाबा त्याचे 40 चोर, शिनचॅन, हेच काय ते उरलेत...', अंबानींच्या लग्नात जॉन सीनाच्या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट
Marathi Actor : दिग्गजांच्या मांदियाळीने सजलेला अंबानींचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यात दिग्गजांनी लावलेल्या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याने मार्मिक पोस्ट केली आहे.
Marathi Actor on Ambani Wedding : सध्या जगभरात एका सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा शुक्रवार 12 जुलै रोजी पार पडला. या सोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनेकांच्या उपस्थितीच्या जोरदार चर्चा देखील रंगल्या आहेत. पण त्या सोहळ्यात एक एन्ट्री मात्र खास ठरली. WWE गाजवणाऱ्या जॉन सीनाला (John Cena) देखील या सोहळ्याचं आमंत्रण होतं. त्यामुळे त्याने देखील उपस्थिती लावली होती. त्याच्या या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता सौरभ चौघुलेची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून अंबानींच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळी अभिनेता सौरभ गोखलेची देखील पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर आता जॉन सीनाच्या उपस्थितीवरुन अभिनेता सौरभ चौघुलेने मार्मिक पोस्ट केली आहे.
सौरभने पोस्टमध्ये काय म्हटलं?
सौरभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, जॉन सीनापण अंबानींच्या लग्नात...? शक्तिमान, अलाद्दिन, अली बाबा त्याचे 40 चोर, शिनचॅन हेच काय ते उरलेत, बाकी सगळे तिकडेच आहेत. अशी मार्मिक पोस्ट सौरभने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जगभरातील दिग्गजांच्या मांदियाळीने सजलेला मुकेश आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. शुक्रवार 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला सिनेसृष्टी, क्रिडाविश्व, बडे उद्योगपती, राजकीय नेते या सगळ्यांनी उपस्थिती लावली. जवळपास संपूर्ण बॉलीवूड या सोहळ्यासाठी उपस्थित होतं.
राजेशाही सोहळ्याची बातच न्यारी
राधिका आणि अनंत यांचा विवाहसोहळा तीन दिवस पार पडणार आहे. 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी बीकेसीमधील जिओ सेंटर येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक बडे नेते वधु-वरांस आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळंत आहे.