एक्स्प्लोर

चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते पुण्यात दोन माणसं एकमेकांशी नीट बोलताना मारामार, जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिदार्थ बोडकेची लगीनघाई

मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawade) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितिक्षा तावडे  (Titeeksha Tawade) आणि दृश्यम 2 अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. याबाबतची माहिती तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघांनीही इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. 'तू अशी जवळ रहा' या सिद्धार्थ आणि तितिक्षा एकत्रित पाहायला मिळाले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

एक-दोन नाही तर चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आता चालू वर्षात एक-दोन नाही तर चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूडमधील काही बायोपिक कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चालू वर्षात रिलीज होणाऱ्या 5 बायोपिकपैकी 3 सिनेमे हे स्पोर्ट्शी निगडीत आहेत. गेल्या वर्षी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूं' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

पुण्यात दोन माणसं एकमेकांशी नीट बोलताना मारामार, त्यामुळे एकांकिकाही 2 लोकांच्या असायच्या : प्रवीण तरडे

"मुंबईवाले म्हणजे 105 ते 110 जण त्यांच्या नाटकात आणि पुण्यात दोन माणसे एकमेकांशी नीट बोलताना मारामार त्यामुळे पुण्यातील एकाकिंका दोन जणांच्याच असायच्या. दोघांच्या वर एकांकिका करायला माणूस टिकला तर पाहिजे. त्यामुळे पुण्याची एकांकिका 2 जणांची आणि मुंबईची एकांकिका 100 जणांची असायची. अशी परिस्थिती का आहे? असा प्रश्न आम्हाला पडत होता", असे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले आहेत. प्रवीण तरडेंच्या मनोगताचे रिल इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Paru and Shiva : झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा आठवडा, 'शिवा' आणि 'पारु' येणार भेटीला

मुंबई : 'झी मराठी'वर (Zee Marathi) सोमवार 12 फेब्रुवारीपासून 'शिवा' आणि 'पारु' या दोन्ही नव्या कोऱ्या मालिका भेटीला येणार आहेत. या दोन्ही मालिकांची गोष्ट नेमकी काय असणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली असल्याचं पाहायला मिळतंय. या दोन्ही मालिकांच्या प्रोमोमध्ये मराठी सिनेसृष्टीतल्या दोन दिग्गज अभिनेत्री पाहायला मिळाल्या आहेत. अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी या दोन अभिनेत्री या मालिकांच्या प्रोमोमध्ये झळकल्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी 'चक्की पीसिंग', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता शिल्पाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये शिल्पा (Shilpa Shetty) जाते फिरवताना दिसत आहे. शिल्पा नुकतेच राजस्थानमध्ये (Rajasthan) पोहोचली आहे. त्यावेळी तिने जात्यावर दळण दळले आहे. शिल्पाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Valentine's Day : प्रेमाचा आठवडा अन् मनोरंजनाची रोमँटीक पर्वणी, 'व्हॅलेंडाईन्स डे'ला चित्रपटगृहात 'या' चित्रपटांची मेजवानी

सध्या सगळीचे व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) सुरु झालाय. त्याच निमित्ताने प्रेक्षकांना देखील मनोरंजनाच्या प्रेमाची पर्वणी मिळणार आहे. कारण व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) दिवशी बॉलीवूडमधील गाजलेले जुने रोमँटीक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या साथीदारासोबत वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या रोमँटीक चित्रपटांची (Movies) पर्वणीच ठरेल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde PC : काहींनी टिंगल केली पण Devendra Fadnavis पुन्हा आले, शिंदेंची तुफान फटकेबाजीCabinet Expansion : गोगावलेंचा 2 वर्षांपूर्वीचा कोट ते लोढांची संस्कृतमध्ये शपथ; शपथविधीचे रंगCabinet Expansion महायुती सरकारचं नवं मंत्रिमंडळ, अनेक इच्छुक नेते वेटिंग लिस्टवरच Special ReportDevendra Fadnavis Full PC : EVM ते खातेवाटप, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची तुफान बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
मोठी बातमी ! रविंद्र चव्हाण अन् सुधीर मुनगंटीवारांचा पत्ता कट; फडणवीस सरकारमध्ये स्थान नाही
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Embed widget