Yog Yogeshwar Jai Shankar : 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Yog Yogeshwar Jai Shankar : शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Yog Yogeshwar Jai Shankar : शिरीष लाटकर (Shirish Latkar) लिखित 'योगयोगेश्वर जय शंकर' Yog (Yogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 30 मे पासून ही मालिका सुरू होत आहे. पार्वतीबाई आणि शंकर महाराज यांच्या नात्यावर भाष्य करणारी 'योगयोगेश्वर जय शंकर' ही मालिका आहे.
शंकर महाराजांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. 'मैं कैलाश का रहने वाला हू','मेरा नाम है शंकर' असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी 'शंकर महाराज' आहेत. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका आहे.
मालिकेमध्ये शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका उमा पेंढारकर साकारणार आहे. उमाने याआधी स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तेव्हा तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आणि आता ती पुन्हा एकदा 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका वठवणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत. आणि बाल शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर साकारणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल उमा म्हणाली,'स्वामिनी' मालिकेत पार्वतीबाई पेशवा हे पात्र साकारल्यावर आता प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे पुन्हा एकदा पार्वतीबाई म्हणून मी आपल्या भेटीस येते आहे. दोन्ही पार्वतीबाई मधील एक समान धागा म्हणजे त्यांच्यातील मातृत्वाचे भाव, देवावर अपार श्रध्दा. महाराजांची आई साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच त्या पात्राविषयी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मालिकेतून महाराजांचा विचार, त्यांचं कार्य, पोहचविण्याची संधी मला मिळाली हा त्यांचा एक मोठा आशीर्वाद असे मी मानते. म्हणूनच अतिशय मनापासून आणि जबाबदारीने या भूमिकेसाठी मी सज्ज झाली आहे.
शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ प्रेक्षकांना 30 मे पासून पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या