एक्स्प्लोर

Yog Yogeshwar Jai Shankar : 95 वर्षीय भक्ताने 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेच्या सेटला दिली भेट

Yog Yogeshwar Jai Shankar : शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Yog Yogeshwar Jai Shankar : शिरीष लाटकर (Shirish Latkar) लिखित 'योगयोगेश्वर जय शंकर' Yog (Yogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत बालशकंराची भूमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान 95 वर्षीय एका भक्ताने 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेच्या सेटला भेट दिली आहे. तसेच बालशंकराचीदेखील भेट घेतली आहे. 

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेद्वारे सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे, त्यापैकी एक भक्त म्हणजे सोलापूरमधील रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका). रघुनाथ कडलास्कर यांना वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत त्यांना शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात लाभला. 

महाराजांच्या कृपाशीर्वादाने रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर यांचे आयुष्य भक्तिमय झाले. 1947 साली धनकवडी येथे महाराजांनी समाधी घेतली.  त्यावेळी पेंटर काकांचे वय वीस वर्ष होते. आज पेंटर काकांचे वय 95 वर्ष असून ते 'योगयोगेश्वर जय शंकर' ही मालिका दररोज पाहतात. त्यामुळे त्यांनी 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेच्या सेटला भेट दिली. दरम्यान बालशंकरच्या भूमिकेत आरुषला पाहून त्यांना गहिवरून आले. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पेंटर काकांनी महाजन विषयी प्रत्यक्ष भेटी चे काही अनुभव सर्वांना सांगितले. दरम्यान सेटवरील वातावरण भक्तीमय होऊन गेले होते. त्यातून सद्गुरु श्री शंकर महाराजांचे त्यांच्या भक्तांवर असलेले अतोनात प्रेम,आणि कृपादृष्टी दिसून आली. शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

शंकर महाराजांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. 'मैं कैलाश का रहने वाला हू','मेरा नाम है शंकर' असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी 'शंकर महाराज' आहेत. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका आहे. 

संबंधित बातम्या

Yog Yogeshwar Jai Shankar : 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Yog Yogeshwar Jay Shankar : कुणाल-करणचं संगीत, तर सोनाली सोनावणेचा आवाज, 'योग योगेश्वर जय शंकर'च्या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांची पसंती!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळाBeed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Embed widget