(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yog Yogeshwar Jay Shankar : कुणाल-करणचं संगीत, तर सोनाली सोनावणेचा आवाज, 'योगयोगेश्वर जय शंकर'च्या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांची पसंती!
Yog Yogeshwar Jay Shankar : सध्या सोशल मीडियावर 'योग योगेश्वर जय शंकर' या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.
Yog Yogeshwar Jay Shankar : अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून सोनाली सोनावणे प्रसिद्ध आहे. या तिघांनी मिळून नुकतंच 'योगयोगेश्वर जय शंकर' (Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेचं टायटल ट्रॅक तयार केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे. तर, कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून, संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे.
या टायटल ट्रॅकचं रेकॉर्डींग कुणाल-करणच्या नवी मुंबई येथील एलीक्झर स्टुडीओमध्ये करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.
हे देवाचे आशीर्वाद!
मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी बोलताना संगीतकार कुणाल-करण सांगतात, ‘या आधी आम्ही अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक तयार केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवाज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना, आम्हीही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर, या गीताचे शब्द संगीतबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहेत. योगयोगेश्वर जय शंकर या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.’
मनातील इच्छा पूर्ण झाली!
टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना गायिका सोनाली सोनावणे सांगते की, ‘अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की, एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल-करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि आता मालिकाविश्वात प्रवास सुरू करताना मला सुंदर असं अध्यात्मिक टायटल ट्रॅक गायला मिळणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. असचं प्रेम कायम असू द्या.’
हेही वाचा :
- Kim Kardashian : क्रिस्टल्स निघाले, धागे तुटले! किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मार्लिन मुन्रोंच्या ड्रेसचं मोठं नुकसान
- Coffee With Karan Season 7 : कॉफी विथ करणचा 7 वा सिझन 'या' दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या कोण-कोण होणार सामील
- Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमधील एका सीनमुळे भडकले नेटकरी; चित्रपट बायकॉट करण्याची युझर्सकडून मागणी