Bigg Boss Marathi: निक्कीला बिग बॉसचा इतका पाठिंबा का? आर्याला घराबाहेर काढण्यामागच्या कारणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Nikki Tamboli & Arya Jadhav: बिग बॉसच्या घरात रॅपर आर्या जाधव हिने निक्की तांबोळीच्या कानाखाली जाळ काढला होता. यामुळे बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढले होते. याबद्दल नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या काही दिवसांपासून घराघरात 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात घडणाऱ्या घडामोडींमुळे बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) प्रेक्षकवर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने आर्या जाधव (Arya Jadhav) हिची घरातून हकालपट्टी केली. आर्याने एका टास्कमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचा नियम मोडला गेला आणि आर्याला घराबाहेर जावे लागले. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावर आर्याला तुफान पाठिंबा मिळताना दिसत आहे. निक्कीच्या वागण्यामुळेच ही वेळ ओढावली, असे काही नेटकरी म्हणत आहेत. मात्र, या कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुख आणि बिग बॉसकडून निक्की उद्धटपणे किंवा राग येईल असे कृत्य करते तेव्हा तिला पाठीशी घातले जाते, असा सूर प्रेक्षकांमधून उमटत आहे.
सोशल मीडियावर आर्याला जसा पाठिंबा मिळत आहे, तसेच निक्कीचेही अनेक चाहते आहेत. त्यांच्याकडूनही निक्कीची आणि बिग बॉसची बाजू मांडली जात आहे. यापैकी एक कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या कमेंटमध्ये एका युजरने बिग बॉस हिने निक्की तांबोळीला कानाखाली बसल्यावर इतक्या तातडीने कारवाई का केली, याबाबत एक थिअरी मांडली आहे. या युजरने बिग बॉसच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, प्रत्येक चॅनलचे काही बेसिक नियम असतात. त्यानुसार स्पर्धकांकडून कॉन्ट्रॅक्टवर सही करुन घेतली जाते. या करारातील नियमांप्रमाणेच प्रत्येक स्पर्धकाने वागले पाहिजे. तसं वागलं नाही तर त्याचे काय परिणाम होतील, याची ताकीदही स्पर्धकाला दिलेली असते. कार्यक्रमाचे नियम तोडून काही निर्णय घेतले असते तर ते चूक ठरले असते.
उद्या निक्की तांबोळी हिच्या वकिलांनी कायदेशीर कारवाई केली असती. निक्की कलर्स चॅनेल आणि आर्या विरोधात घरगुती हिंसाचाराची केस करु शकली असती. त्यामुळे बिग बॉसला हतबल होऊन आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा लागला, हा निर्णय घेणे बिग बॉसवर बंधनकारक होते, अशी थिअरी संबंधित युजरने मांडली आहे. या थिअरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मात्र, यानंतरही बिग बॉस आणि रितेश देशमुख निक्कीला इतरांच्या तुलनेत झुकते माप देतात का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आणखी वाचा
पिक्चर अभी बाकी है! बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री? गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता