Vikas Sethi Death : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्याचं निधन, विकास सेठी काळाच्या पडद्याआड
Vikas Sethi Passes Away : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता विकास सेठी याचं निधन झालं आहे.
![Vikas Sethi Death : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्याचं निधन, विकास सेठी काळाच्या पडद्याआड vikas sethi kyunki saas bhi kabhi bahu thi fame popular tv actor passes away at age of 48 dies of cardiac arrest Vikas Sethi Death : 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्याचं निधन, विकास सेठी काळाच्या पडद्याआड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/5f04df44dd18462fa909c6ac9b3a50c61725791009382322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Actor Vikas Sethi Passed Away : छोट्या पडद्यावरील गाजलेली टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता विकास सेठी याचं निधन झालं आहे. विकास सेठीच्या निधनानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विकास सेठी आता या जगात नाही. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.
'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं निधन
2000 च्या दशकात 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा' आणि 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या लोकप्रिय शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता विकास सेठी याचं रविवारी, 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विकास सेठी याचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विकासच्या मागे पत्नी जान्हवी सेठी आणि जुळी मुले असं कुटुंब आहे.
विकास सेठी काळाच्या पडद्याआड
अभिनेता विकास सेठी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला होता. 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय शोमध्ये त्यांनी प्रेम बासूची भूमिका साकारली होती. त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 'कहीं तो होगा' मालिकेचा समावेश आहे. कहीं तो होगा' मालिकेमध्ये त्याने स्वयं शेरगिलची भूमिका साकारली होती.
लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला विकास सेठी
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Deepika Padukone Baby : दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)