एक्स्प्लोर

अनुपम खेर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होतं. परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता.

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती झाली आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था ही पुण्यात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अभिनेता गजेंद्र चौहान यांना प्रतिष्ठित एफटीआयआयचे अध्यक्ष बनवलं होतं. परंतु विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध केला होता. अनुपम खेर यांनी 1982 मध्ये 'आगमन' या चित्रपटातून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती. खेर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2004 मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सरकार आणि मोदींचे आभार : किरण खेर अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजप खासदार किरण खेर यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. "मला अनुपम खेर यांचा अभिमान आहे. ते जबाबदारी योग्यरित्या निभावतील. मी सरकार आणि मोदींची आभारी आहे, अशा भावना किरण खेर यांनी व्यक्त केलं.  "पण कोणत्याही संस्थेचं अध्यक्षपद हे काटेरी मुकुटासारखं असतं, असंही त्या म्हणाल्या. खेर यांच्या नियुक्तीचं स्वागत सुभाष घई, मुधर भांडारकर, अशोक पंडित यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. "या पदासाठी अनुपम खेर योग्य व्यक्ती आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती चांगली असायला हवी. अनुपम खेर चांगले शिक्षक ठरतील," असं असं सुभाष घई म्हणाले. मधुर भांडारकर म्हाणाले की, "ते विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतील आणि संस्थेला नवी उंचीवर नेऊन ठेवतील. ते 30-35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ते फारच विश्वासार्ह आहेत. कोण कोणत्या पक्षाचा समर्थक आहे हे न पाहता लोकांनी त्याचं काम पाहायला हवं." गजेंद्र चौहान यांना विरोध का? एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि भाजप कार्यकर्ते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. याला विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी जवळपास 100 दिवसांपेक्षा जास्त आंदोलन केलं. मोदी सरकार हेकेखोरपणा करत असून स्वायत्त संस्थांच्या प्रतिष्ठेला तडा देण्याचं काम सुरु असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. 'महाभारत'मध्ये युधिष्ठीरची भूमिका निभावणारे गजेंद्र चौहान भाजप पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक होते. सध्या ते भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. शिवाय अनेक मालिकातून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावंही चर्चेत होती. मात्र त्या सगळ्यांना मागे टाकत गजेंद्र चौहान यांच्या नावावर माहिती आणि प्रसारण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने सर्वसामान्यही अवाक् झाले. संबंधित बातम्या FTII च्या विद्यार्थ्यांचं जंतरमंतरवर आंदोलन, गजेंद्र चौहानांच्या निवडीविरोधात संसदेवर मोर्चा ‘संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न’, FTII विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहुल गांधी  गजेंद्र चौहान यांना विरोध करणारे हिंदूविरोधी : संघ आंदोलन सुरूच राहणार, FTII च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला ठणकावलं ‘बजरंगी भाईजान’ FTII च्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी; गजेंद्र चौहानांनी राजीनामा द्यावा, सलमानचा सल्ला आंदोलन थांबवा, अन्यथा कठोर कारवाई करू, FTII च्या विद्यार्थ्यांना नोटीस गजेंद्र चौहानांविरोधात बॉलिवूडमधून आवाज; ऋषी कपूर, अनुपम खेर विद्यार्थ्यांच्या पाठीशी FTII च्या प्रमुखपदी प्रेरणादायी व्यक्ती असावं, रणबीर कपूरचा आंदोलनाला पाठिंबा FTII बंद की मुंबईला हलवणार? माहिती प्रसारण खात्याच्या सूचनेनं नव्या वादाला तोंड FTII च्या मुलांवर अन्याय होतोय, अभिनेत्री पल्लवी जोशींची टीका; संचालकपदाचाही राजीनामा ‘एफटीआयआय’च्या वादात ‘आप’ची उडी, कॅम्पसमध्ये भाजपविरोधात निदर्शने FTIIमध्ये ‘महाभारत’, अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहानांची नियुक्ती, विद्यार्थी आक्रमक 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget