Rashmi Desai Birthday : 'उतरन' फेम अभिनेत्रीचा चार वर्षातच मोडला संसार, लव्ह लाईफ कायमच चर्चेत; रश्मी देसाईबाबतच्या 'या' गोष्टी माहित आहेत?
Rashmi Desai Love Life : अभिनेत्री रश्मी देसाईचा आज 13 फेब्रुवारी रोजी 37 वा वाढदिवस आहे. रश्मी देसाईबाबतच्या 'या' गोष्टी माहित आहेत?
Rashmi Desai Love Life : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईचा (Rashmi Desai) आज 13 फेब्रुवारी रोजी 37 वा वाढदिवस आहे. कामापेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे (Rashmi Desai Love Life) ती अधिक चर्चेत आली. कधी नंदीश संधू (Nandish Sandhu) तर कधी अरहान खानसोबतच्या (Arhan Khan) लव्ह लाईफमुळे खूप चर्चा झाली. रश्मी देसाईने तिचं सौंदर्य आणि अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. रश्मीने छोट्या पडद्यावरील 'उतरन' आणि 'दिल से दिल तक' मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.
अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसाममध्ये झाला. रश्मीने वयाच्या 16 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 2006 मध्ये 'रावण' या मालिकेतून रश्मीने करिअरची सुरुवात केली. पण तिला खरी ओळख 'उतरन' या मालिकेतून ओळख मिळाली. अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या 'दिल से दिल तक' मालिकेतील तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला. याशिवाय रश्मीने हिंदी, भोजपुरी, इंग्रजी आणि गुजराती चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
View this post on Instagram
रश्मी तिच्या लव्ह लाईफमुळे अनेक वेळा चर्चेत आली. अभिनेता नंदिश संधूसोबत (Nandish Singh Sandhu) तिचं पहिल्यांदा नाव जोडलं गेलं. 'उतरन'च्या सेटवर काम करत असताना दोघे एकमेकांची मैत्री झाली आणि नंतर याचं रुपांतर प्रेमात झालं. रश्मी देसाई आणि नंदिश यांनी 12 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केलं. मात्र, अवघ्या चार वर्षांनीच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर रश्मीचं नाव लक्ष्य लालवानीसोबत (Laksh Lalwani) जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार, रश्मी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या लक्ष्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, रश्मीची आई या नात्यावर खूश नव्हती, त्यामुळे त्यांचं नात पुढे टिकलं नाही.
रश्मीचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेलं होतं. 'दिल से दिल तक' या मालिकेदरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्यानंतर रश्मीचंही अरहान खानवर प्रेम जडलं. दोघे बिग बॉस 13 मध्ये एकमेकांना भेटले. रश्मी अरहानशी लग्न करण्याचा विचारात होती, असं म्हटले जातं. पण तेही नातं फार काळ टिकू शकलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :