Adil Khan Girlfriend : राखी सावंतची 'सौतन', 'या' अभिनेत्रीसाठी केला विश्वासघात, आदिल खानची गर्लफ्रेंड तनू आहे तरी कोण?
Rakhi Sawant Husband Adil Khan : तनू नावाच्या अभिनेत्रीसाठी पती आदिल खानने विश्वासघात दिल्याचा आरोप अभिनेत्री राखी सावंतने केला आहे.
![Adil Khan Girlfriend : राखी सावंतची 'सौतन', 'या' अभिनेत्रीसाठी केला विश्वासघात, आदिल खानची गर्लफ्रेंड तनू आहे तरी कोण? rakhi sawant husband adil khan durrani girlfriend tanu chandel who is tanu chandel Adil Khan Girlfriend : राखी सावंतची 'सौतन', 'या' अभिनेत्रीसाठी केला विश्वासघात, आदिल खानची गर्लफ्रेंड तनू आहे तरी कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/ee6871c44fed16eeb3b09e7f412bb6511675750467070322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rakhi Sawant's Husband's Girlfriend Photo got Viral : 'ड्रामा क्वीन' (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने पती आदिल खानचे विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असल्याचा दावा केला आहे. राखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे. हे नाव समोर येताच आदिलच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
अभिनेत्री राखी सावंतच्या दुसऱ्या विवाहित आयुष्यात वादळ आले आहे. राखी सावंतचं दुसरं लग्न चांगलंच चर्चेत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिची पती आदिल यांच्यातील वाद समोर आले होते. आता राखी सावंतने दावा केला आहे. राखी सावंतने आरोप केला आहे की, तिचा पती आदिल एका तनू नावाच्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या याच नात्यामुळे राखी आणि आदिलमध्ये दुरावा निर्माण झाल्याचंही राखीने सांगितलं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी राखी सावंतने मीडियासमोर दावा केला होता की, तिचा पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे. त्यानंतर राखीने त्या तरुणीचं नावही उघड केले. त्यानंतर आदिलच्या कथित गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला आहे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
'ही' आहे आदिल खानची गर्लफ्रेंड?
राखी सावंतने आरोप केला आहे की, अभिनेत्री तनू चंडेल (Tanu Chandel) आणि आदिलचं अफेअर सुरु आहे. अभिनेत्री तनू चंडेल (Tanu Chandel) ही आदिल खानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. यानंतर आदिल आणि तनूचे फोटो व्हायरल झाले आहेत.
कोण आहे तनू चंडेल?
राखीच्या म्हणण्यानुसार, तनू एक अभिनेत्री आणि बिजनेसबुमन आहे. तनू गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे आणि काही छोट्या प्रोजेक्टमध्येही दिसली आहे. तिचे वय 37 वर्षे आहे. तनू मूळची ही इंदौरची आहे. तिथे तिचा एक फ्लॅटही आहे. तिच्याकडे स्वतःची बीएमडब्ल्यू कार आहे. राखीच्या म्हणण्यानुसार, तनूने आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)