एक्स्प्लोर
कॉम्प्रोमाईज करणार का? व्हॉट्सअॅपवर अभिनेत्रीचं उत्तर...
सुलग्ना चॅटर्जी 'दिल से दी दुआ... सौभाग्यवती भव:' (2011) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्म पुणे टीसी (2012) मध्ये झळकली होती.

मुंबई : मनोरंजन विश्वातील कास्टिंग काऊचविषयी अनेक अभिनेत्री मोकळेपणाने बोलत आहेत. चित्रपट, टीव्ही इंडस्ट्री, मॉडेलिंग अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार सुरु असल्याचं म्हटलं जातं. टीव्ही अभिनेत्री सुलग्ना चॅटर्जीने आपल्याला आलेली 'कॉम्प्रोमाईज'ची ऑफर धुडकावल्याचं सांगितलं आहे.
सुलग्ना चॅटर्जी 'दिल से दी दुआ... सौभाग्यवती भव:' (2011) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्म पुणे टीसी (2012) मध्ये झळकली होती.
व्हॉट्सअॅपवर तिला एका व्यक्तीने कॉम्प्रोमाईज करण्याची अर्थात अनैतिक संबंध ठेवण्याविषयी विचारणा केली. तिने तात्काळ त्याची मागणी धुडकावून लावताच, माझी नाही दिग्दर्शकाची इच्छा असल्याचं सांगितलं. तरीही सुलग्ना आपल्या निर्णयावर ठाम राहिली.
सुलग्नाने या चॅटचा स्क्रीनशॉट काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अर्थात तिने या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. 'अशा प्रकारच्या ऑफर्स इतक्या कॉमन होतात, की तुम्हाला त्यामुळे फरक पडेनासा होतो' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे. सुलग्नाच्या निर्णयाचं सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
क्राईम
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
