एक्स्प्लोर
Advertisement
बॉसच्या जाचाने पत्नीचा गर्भपात, अभिनेता सुमीत सचदेवचा दावा
बॉसने दिलेल्या मानसिक त्रासामुळे पत्नी अमृताचा गर्भपात झाला, असा दावा टीव्ही अभिनेता सुमीत सचदेवने इन्स्टाग्रामवर केला आहे.
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सुमीत सचदेवच्या घरात दुःखाचं वातावरण आहे. सुमीतची पत्नी अमृता गुजरालचा दुर्दैवाने गर्भपात झाला. बॉसने दिलेल्या मानसिक त्रासामुळे अमृताचा गर्भपात झाला, असा दावा सुमीतने इन्स्टाग्रामवर केला आहे.
सुमीतची पत्नी अमृता पाच महिन्यांची गरोदर होती. मात्र अमृताला तिच्या वरिष्ठांनी दिलेल्या त्रासामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव सहन करावा लागला. याच कारणाने आम्ही आमचं मूल गमावलं, असं सुमीतने म्हटलं आहे. न्याय मिळवण्यासाठी सुमीतने याचिका दाखल केली आहे.
'ये है मोहब्बते' मालिकेत मणी, तर 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत तुलसीचा मुलगा गौतम विरानीची भूमिका सुमीत सचदेवने साकारली होती. अमृता आणि सुमीत यांनी 2007 मध्ये विवाह केला होता.
'तुम्हा सगळ्यांची इहानशी ओळख करुन देतो. अमृता आणि सुमीत यांचा लाडका मुलगा. तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमचं जीवन उजळून गेलं. आम्ही दोनाचे तीन होणार होतो. तू आमच्याकडे पाहून हात हलवताना आम्ही पाहिलं, पण आम्हाला काय माहित तू अलविदा करत होतास. तू आमच्यासोबत घालवलेल्या अल्प काळाचं कारण काय होतं? तुझा जन्म झाला तो थेट स्वर्गात. तुझ्यावर कायम आम्ही प्रेम करत राहू आणि तू नेहमी आमच्या स्मरणात राहशील. कृपया या याचिकेवर सही करा. आणि इतरांना सांगा. जनजागृती करा' असं सुमीतने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.
सुमीतने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ऑनलाईन याचिका लिहिली आहे. 'कामाच्या ठिकाणी होणारा छळ थांबवा. मोदीजी, तुम्ही प्रसुती रजेचा कालावधी का वाढवलात? मॅटर्निटी लीव्हबाबत वैयक्तिक कारणातून वरिष्ठांनी दिलेल्या जाचामुळे एका न जन्मलेल्या जीवाचा अंत झाला.'
'अमृता सचदेव ही गोव्यातील कारावेला हॉटेलमध्ये 2016 पासून वरिष्ठ पदावर कार्यरत होती. डॉक्टरांनी बेडरेस्ट घेण्याचा सल्ला दिल्यामुळे तिने प्रसुती रजेसाठी अर्ज केला, मात्र तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिला गर्भातील बाळ गमवावं लागलं. प्रल्हाद अडवाणी यांनी तिला अचानक नोकरीवरुन काढून टाकल्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून आमच्या इहानचा मृत्यू झाला. हा अपघात नसून हत्या आहे' असा संताप याचिकेत सुमीतने व्यक्त केला आहे.
बॉसने दिलेल्या मानसिक त्रासामुळे पत्नी अमृताचा गर्भपात झाला, असा दावा टीव्ही अभिनेता सुमीत सचदेवने इन्स्टाग्रामवर केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement