मंजुळा सगळ्यांना देणार गुंगीचं औषध; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल
‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंजुळा ही गुंगीच्या औषधाबद्दल सगळ्यांना सांगत आहे, असं या प्रोमोमध्ये दिसत आहे.
Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ट्वीस्ट येत आहेत. मल्हार आणि मोनिका यांच्या घरात मंजुळाची एन्ट्री झाल्यानं अनेक घडामोडी घडत आहेत. मंजुळानं लपवलेले हिरे हे मोनिका आणि मल्हार यांच्या घरात आहेत. हे हिरे शोधण्यासाठी मंजुळा ही मोनिका आणि मल्हार यांच्या घरी आली आहे. मंजुळाला गुंगीचं औषध देण्यासाठी आता एक व्यक्ती मंजुळाचा भाऊ होऊन मल्हार आणि मोनिका यांच्या घरात आला आहे. आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की, तो व्यक्ती मंजुळाला गुंगीचे औषध देतो.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, मोनिका त्यांच्या घरी आलेल्या माणसाला म्हणते, "तुझ्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कळालं आहे. तुमच्या बहिण भावाच्या नाटकाबद्दल आम्हाला सगळं कळालं आहे. एक मिनिटसुद्धा इथे थांबायचं नाही. "
मोनिकाचं हे बोलणं ऐकून तो व्यक्ती घाबरतो. तो घरातील हेल्परला म्हणतो, 'पाणी आणि चहा मिळेल का?' मंजुळा देखील निरंजनला जायला सांगते. त्यानंतर मंजुळा आणि मल्हार आणि मोनिकाच्या घरी आलेला व्यक्ती एकमेकांसोबत बोलतात. मंजुळा त्या व्यक्तीला म्हणते, 'तिला सगळं सांगणार होता का गुंगीच्या औषधाबद्दल? तिला काहीच कळालं नाहीये' नंतर मंजुळा ही त्या माणसाकडून गुंगीचं औषध घेते. तो व्यक्ती मंजुळाला म्हणतो, 'हे सरबतामध्ये टाकायचं' यावर मंजुळा म्हणते,' आज रात्रीच हे काम करते. एकदा हिरे सापडले की, या घराला रामराम'
आता मंजुळा ही खरंच ते गुंगीचं औधष टाकून सर्वांना बेशुद्ध करते का? मंजुळा ही वैदेही सारखी दिसते हे मल्हारला काळते का? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
तुझेच मी गीत गात आहे या या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tujhech Mi Geet Gaat Aahe : मोनिकाने मागितली मंजुळाची माफी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल