Tujhech Mi Geet Gaat Aahe : मोनिकाने मागितली मंजुळाची माफी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल
तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tujhech Mi Geet Gaat Aahe : तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाला स्वराजनं एका खोलीमध्ये कोंडलं आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाला स्वराज ऊर्फ स्वरानं एका रुममध्ये कोंडलं आहे. हे पाहिल्यानंतर मल्हार स्वराजला विचारतो, 'हे का केलं?' यावर स्वराज म्हणतो, "मंजुळा या पिहूला लावणी शिकवत होत्या. तेव्हा तिथे मोनिका काकू आल्या, मोनिका काकू या मंजुळा यांना म्हणाल्या की, पिहूला लावणी शिकवायची नाही आणि मोनिका काकूंनी मंजुळावर हात उगारला. त्यामुळे मंजुळा यांना राग आला आहे. त्यांनी ठरवलं आहे की, त्या इथे राहणार नाहीत. त्या बाहेर जाऊ नयेत म्हणून आम्ही त्यांना कोंडलं आहे.' पिहू मंजुळाची माफी मागते. त्यानंतर मल्हार मोनिकाला मंजुळाची माफी मागायला सांगतो. मोनिका ही मंजुळाची माफी मागते. ती म्हणते, 'रागाच्या भरात जास्त बोलले मी. सॉरी, तू जाऊ नकोस' हे ऐकून स्वराजला आनंद होतो.
स्वराज हा मंजुळाला म्हणतो, 'आता पिहू आणि मंजुळा यांनी तुमची माफी मागितली आहे, आता तुम्ही जाणार नाही ना?' यावर मंजुळा म्हणते, 'पिहू माझा तुझ्यावर राग नाहीये. मी आनंदानं तुला गाणं शिकवेन'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते आणि स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर ही साकारते. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या: