एक्स्प्लोर

Monika Bhadoriya: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका 'दयाबेन'ने का सोडली? शोमधील 'बावरी' म्हणाली...

मोनिकानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेच्या निर्मात्यांबाबत आणि कलाकारांबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

Monika Bhadoriya:  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून वादात भोवऱ्यात अडकला आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये मिसेस सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने या शोच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. हा शो सोडलेल्या इतर कलाकारांनी देखील शोच्या निर्मात्यांवर आरोप केले. 'तारक मेहता'मध्ये बावरी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियानं  (Monika Bhadoriya)  'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेच्या निर्मात्यांबाबत आणि कलाकारांबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेतील दयाबेन ही भूमिका दिशा वकानी ही साकारत होती. ही मालिका दिशानं सोडली. याबाबत मोनिकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, दिशा कादाचित दुखावली गेली असावी. पुढे ती म्हणाली,  'या विषयावर मी भाष्य करू इच्छित नाही. कदाचित तिला कोणत्या तरी गोष्टीचे खूप वाईट वाटले असावे.'

मोनिकाने पुढे मुलाखतीमध्ये  सांगितले की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करत असताना,  तिला देखील पेमेंटच्या समस्येचा सामना करावा लागला होता. या कारणामुळे अनेक कलाकारांनी तो शो सोडला होता.

'मला माझ्या कष्टाच्या पैशासाठी वर्षभर झगडावे लागले, तरीही ते पैसे देण्यास तयार नव्हते. मी CINTAA कडे तक्रार करणार असल्याचे त्यांना सांगितल्यावर ते घाबरले आणि त्यानंतर त्यांनी माझे पेमेंट मला दिले. तारक मेहता या मालिकेसोबतच्या माझ्या संपूर्ण सहा वर्षांच्या प्रवासात मला कधीही ठरलेले पेमेंट मिळाले नाही. काय ठरले ते मला आठवत नाही म्हणत या मालिकेचे मेकर्स शब्द मागे घेत होते.' असंही मोनिकानं या मुलाखतीमध्ये सांगितलं. 

पुढे मोनिका म्हणाली, 'तारक मेहता या मालिकेचे मेकर्स सर्वांचे पेमेंट अडवून ठेवतात. शैलेश जी, गुरचरण सिंह, राज अनडकट, जेनिफर, नेहा मेहता या सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मी एक वर्ष संघर्ष केला. मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे पण कधीच मला मदत मिळाली नाही. मी त्यांना नोटीस पाठवल्यावर त्यांनी माझे पेमेंट मंजूर केले.'

28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

 इतर महत्त्वाच्या बातम्या:

Monika Bhadoriya: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर कसे वातावरण होते? अभिनेत्री म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस 6'ची पहिली फायनलिस्ट, पण 'ती' एक चूक अन् सारं गमावलं; तन्वी कोलते ट्रोल, नेटकऱ्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीतून काढलं बाहेर
'बिग बॉस 6'ची पहिली फायनलिस्ट, पण 'ती' एक चूक अन् सारं गमावलं; तन्वी कोलते ट्रोल, नेटकऱ्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीतून काढलं बाहेर
Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
अपूर्वा नेमळेकर मॅट्रिमोनी साईट्स पाहून वैतागली, भाचीनं रिक्वेस्ट पाठवली अन् भेटताक्षणी जोडी जुळली; अपूर्वा-तनुजच्या 'दुसऱ्या लग्नाची गोष्ट'
अपूर्वा नेमळेकर मॅट्रिमोनी साईट्स पाहून वैतागली, भाचीनं रिक्वेस्ट पाठवली अन् भेटताक्षणी जोडी जुळली; अपूर्वा-तनुजच्या 'दुसऱ्या लग्नाची गोष्ट'

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Embed widget