TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बंद होणार? रिटा रिपोर्टरने दिली महत्त्वाची माहिती
TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली 14 वर्षे ही विनोदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता या मालिकेचा टीआरपी घसरल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजाने यासंदर्भात म्हणाली, मला नाही वाटत मालिका बंद होईल.
प्रत्येक वयोगटातील मंडळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आवडीने पाहतात. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल, बबिता जी, अय्यर, भिडे अशा मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. पण गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकला आहे. कलाकारांसह गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेची दिग्दर्शक मालव राजदा यांनीदेखील ही मालिका सोडली. तेव्हापासून ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
रिटा रोपोर्टर म्हणाली...
सोशल मीडियावरील चर्चांना पूर्णविराम देत मालव राजदा यांची पत्नी आणि मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा म्हणाली,"मला नाही वाटत टीआरपी घसरल्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका बंद होईल. मालिकेचा दर्जा पूर्वीसारखाच राहील".
प्रिया पुढे म्हणाली,"प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या कलाकारांना मालिकेत पाहता येणार नाही. ते साकारत असलेली भूमिका अचानक दुसरं कोणीतरी साकारताना दिसेल. पण हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन आहे. पण मालिका मात्र सुरुच राहील...बंद होणार नाही, असं मला वाटतं".
View this post on Instagram
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग 28 जुलै 2008 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेतील मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘देवदास’, ‘मंगल पांडे', ‘जोधा अकबर’, ‘लव्ह स्टोरी 2050’ या चित्रपटांमध्ये दिशाने काम केले आहे.
संबंधित बातम्या