Majhi Tujhi Reshimgath : ही रेशीमगाठ तुटायची नाय... 'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगत होती. पण आता ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा 17 सप्टेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. पण मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
View this post on Instagram
झी मराठीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे. 'ही रेशीमगाठ तुटायची नाय...' असं म्हणत झी मराठीने नेहा, परी आणि यशचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे," एवढ्या सहजासहजी कशी तुटेल तुमची आणि आमची रेशीमगाठ".
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकुळ (Mayra Vaikul) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य जागवत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेजागी आता 'दार उघड बये' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या