(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tharla Tar Mag : सायली-अर्जुनची केमिस्ट्री, टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक अन् बरचं काही..; जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' मालिकेला एक वर्ष पूर्ण
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay karte) सारख्या लोकप्रिय मालिकेला या मालिकेने मागे टाकलं आहे. आता या बहुचर्चित मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी
'ठरलं तर मग' या मालिकेचा 5 डिसेंबर 2022 रोजी पहिला भाग प्रसारित झाला होता. गेल्या वर्षभरात लोकल डब्यापासून ते घराघरांत या मालिकेची चर्चा रंगली. आजही ही मालिका ट्रेंडमध्ये आहे. लहानमुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच मंडळी ही मालिका आवडीने पाहतात. जुई गडकरी आणि अमित भानुशाली या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून जुईने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. तगडी स्टारकास्ट, साडे आठचा प्राईम स्लॉट आणि मधुभाऊंच्या केसभोवती फिरणारं मालिकेचं कथानक तसेच आदेश बांदेकरांची निर्मिती अशा सर्व गोष्टी असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी या मालिकेत पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
'ठरलं तर मग' मालिकेबद्दल बोलताना जुई म्हणते..
ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली,"ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं".
तगडी स्टारकास्ट असलेली 'ठरलं तर मग'
जुई गडकरी आणि अमित भानुशालीसोबत ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, माधव अभ्यंकर, मीरा जगन्नाथ, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्ञानेश वाडेकर, नारायण जाधव अशी दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत.
संंबंधित बातम्या