Telly masala: 'सालार' पुढे फिका पडला 'डंकी' ते मुग्धा वैशंपायनचं सासरी झालं जंगी स्वागत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Salaar And Dunki Box Office Collection: प्रभासच्या 'सालार' पुढे फिका पडला किंग खानचा 'डंकी'; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Salaar And Dunki Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून बिग बजेट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहे. अशातच प्रेक्षकांच्या 2023 या वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक करण्यासाठी प्रभासचा (Prabhas) सालार (Salaar) आणि शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डंकी (Dunki) हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. डंकी हा चित्रपट सालार या चित्रपटाच्या एक दिवस आधी रिलीज झाला. पण तरी देखील सालार या चित्रपटापेक्षा डंकी हा चित्रपट जास्त कमाई करत आहे. जाणून घेऊयात डंकी आणि सालार या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये बिहारचा अविनाश जिंकू शकला नाही एक कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा सध्या ग्रँड वीक सुरु आहे. गेल्या आठवड्यात बिहारचा अविनाश भारती हा स्पर्धक केबीसीच्या हॉट सीटवर बसला. अविनाश हा केबीसीमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचला. पण तो एक कोटी बक्षिसासाठी बिग बींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
VIDEO: फुलांच्या पायघड्या, औक्षण आणि भन्नाट उखाणा; मुग्धा वैशंपायनचं सासरी 'असं' झालं स्वागत
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate: 'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशताच मुग्धा आणि प्रथमेश यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लघाटे कुटुंब मुग्धाचं स्वागत करताना दिसत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
VIDEO : हृतिक रोशनची एक्स वाईफ बॉयफ्रेंडसोबत वेकेशनला निघाली, पण एअरपोर्टवरुनच घरी परतली; नेमकं काय घडलं?
Sussanne Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) एक्स वाईफ सुझान खान (Sussanne Khan) ही अनेकदा तिचा बॉयफ्रेंड अरसलान गोनीसोबत स्पॉट होते. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आणि वेकेशन एन्जॉय करण्यासाठी सुझान आणि अरसलान हे मुंबईच्याबाहेर जाण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले. पण यादरम्यान असे काही घडले की, सुझान आणि अरसलान यांना परत घरी परतावे लागले. सुझान आणि अरसलान हे एअरपोर्टवरुनच घरी का परतले? जाणून घेऊयात...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ram Mandir Inauguration: 'रामायण'मधील लक्ष्मणाला मिळाले नाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण; अभिनेत्यानं व्यक्त केली खंत
Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir Inauguratio) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी सध्या उत्साहात सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील कलाकार देखील सहभागी होणार आहेत. 'रामायण' या लोकप्रिय मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण 'रामायण' या मालिकेतील लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांना या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यामुळे ते नाराज झाले आहेत. सुनील लाहिरी यांनी याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.