Kaun Banega Crorepati 15: 'कौन बनेगा करोडपती 15' शोमध्ये बिहारचा अविनाश जिंकू शकला नाही एक कोटी; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
Kaun Banega Crorepati 15: अविनाश हा केबीसीमध्ये एक कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचला. पण तो एक कोटी बक्षिसासाठी बिग बींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.
Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. या कार्यक्रमाचा सध्या ग्रँड वीक सुरु आहे. गेल्या आठवड्यात बिहारचा अविनाश भारती हा स्पर्धक केबीसीच्या हॉट सीटवर बसला. अविनाश हा केबीसीमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचला. पण तो एक कोटी बक्षिसासाठी बिग बींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.
केबीसीमध्ये एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही अविनाश
अविनाशने केबीसी गेममधील सर्व लाइफलाइन्सचा वापरून 50 लाख रुपये जिंकले. यानंतर अविनाशला एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देण्यापूर्वी बिग बींनी त्यांना सांगितले की, त्यांच्याकडे आता कोणतीही लाइफलाइन उरलेली नाही. त्यामुळे
अविनाश भारतीने गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.
अविनाशला एक कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न- 15 वर्षांचा भारतीय वंशाचा, व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च ब्रिटिश लष्करी सन्मान प्राप्त करणारा सर्वात तरुण मानला जाणारा मुलगा यापैकी कोण आहे?
पर्याय-
A) अँड्र्यू फिट्झगिबन B) फ्रान्सिस फिट्झपॅट्रिक C) रिचर्ड फिट्झगेराल्ड D) चार्ल्स फिट्झक्लेरेन्स
उत्तर- A) अँड्र्यू फिट्झगिबन
बिहारमधील एका छोट्याशा गावातील अविनाश भारती हा दिल्लीत सिव्हिल सर्व्हिसेसची सध्या तयार करत असल्यामुळे तो आपल्या कुटुंबापासून दूर राहतो आहे. केबीसीमध्ये त्यानं सांगितलं की तो गेल्या चार वर्षांपासून तो वडिलांना आणि आईला भेटू शकलेला नाही.
बिग बींना भेटून भावूक झाला अविनाश
बिग बींना भेटल्यानंतर अविनाश खूप भावूक झाला होता. केबीसीमध्ये त्यानं सांगितलं की को यूपीएससीची तयारी करत आहे. तो म्हणाला, 'मी 2019 मध्ये माझे घर सोडले आणि मी माझ्या आईला वचन दिले की, मी आयएएस अधिकारी झालो किंवा केबीसीमध्ये गेलो तरच परत घरी येईल'.
केबीसीचा 15 वा सीझन घेणार प्रेक्षकांचा निरोप
अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 15 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता या कार्यक्रमाचा 15 वा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या: