Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढांच्या एक्झिटवर निर्माते असित कुमार मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले ‘तारक मेहताच्या नसण्याने...’
Shailesh Lodha : छोट्या पडद्यावर्षी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) नुकतीच 14 वर्ष पूर्ण केली.
Shailesh Lodha : छोट्या पडद्यावर्षी लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) नुकतीच 14 वर्ष पूर्ण केली. सध्या ही मालिका काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला. सध्या मालिकेतील महत्त्वाचे पात्र अर्थात ‘तारक मेहता’ मालिकेत दिसत नसल्याने ‘तारक मेहता का उल्टा’ चष्मा’ चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आता यावर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेली 14 या मालिकेत अभिनेते शैलेश लोढा ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारत होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र, मागील काही काळापासून ते या मालिकेच्या एकाही भागात दिसलेले नाहीत. तर, दुसरीकडे ते सेटवरच येत नसून, त्यांनी मालिका सोडली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
काय म्हणाले असित कुमार मोदी?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत की, 'अभिनेत्याला परत यायचे असेल तर तो येऊ शकतो, अन्यथा शो कोणत्याही कारणाने थांबणार नाही.’ असती कुमार मोदी पुढे म्हणाले की, मला सगळ्यांनाच जोडून ठेवायचे आहे. काही लोकांना यायचे नसेल तर, ती त्यांची इच्छा आहे. ज्यांचे पोट भरले आहे, त्यांना वाटते की आपण खूप काही केले आहे, अजून काहीतरी केले पाहिजे, देवाने आपल्याला खूप प्रतिभा दिली आहे. आपण फक्त तारक मेहतापुरते मर्यादित राहू नये, ज्यांना हे वाटत आहे आणि त्यांना इतर काही समजून घ्यायचे नाही. तरीही मी म्हणेन की, त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा.
शो मस्ट गो ऑन!
असित मोदी म्हणाले, त्यांच्या परत न येण्यामुळे हा शो थांबणार नाही. नवीन तारक मेहता प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच येतील. जुने तारक मेहता परत आले तर आनंद होईल, मात्र नवीन तारक मेहता आले तरी तितकाच आनंद वाटेल. आता प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवणं, हेच माझं ध्येय आहे.
‘या’ अभिनेत्यानेही सोडली मालिका
अभिनेता शैलेश लोढा यांनी पुन्हा या मालिकेत परतावे, अशी या मालिकेच्या सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, यावर शैलेश लोढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान या मालिकेत ‘टप्पू’ साकारणाऱ्या राज अंदकतने देखील ही मालिका सोडल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :