Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर
2022 मध्ये अनेक बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची अभिनेता यशच्या बहुचर्चित KGF 2 या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
![Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर biggest box office clash of 2022 aamir khan laal singh chaddha clash with yash kgf 2 Biggest Box Office Clash: यशच्या KGF 2 आणि आमिरच्या Laal Singh Chaddha ची बॉक्स ऑफिसवर टक्कर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/00aceb1100f80f65c9e15277ca98368c_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KGF 2 Vs Laal Singh Chaddha : 2022 मध्ये अनेक बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट देखील 2022 मध्ये रिलीज होणार आहे. 20 नोव्हेंबरला या चित्रपटांच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची अभिनेता यशच्या बहुचर्चित KGF 2 या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांची जास्त पसंती कोणत्या चित्रपटाला मिळेल हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
केजीएफ-2
अभिनेता यशने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केजीएफ-2 या चित्रपटाचा पोस्टर आणि रिलीज डेट जाहिर केली होती. यशने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते, 'आम्ही 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात येणार आहोत.' केजीएफचा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. 250 कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
लाल सिंह चड्ढा
आमिर खान प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया अकाऊंटने नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर आणि करिना खास लूकमध्ये दिसत आहे. आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने हा पोस्टर शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले, 'आमच्या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि रिलीज डेट शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे.' लाल सिंह चड्ढा हा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे चित्रपटात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)