'तारक मेहता' फेम प्रसिद्ध अभिनेत्याची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; VIDEO शेअर करत म्हणाला...
TMKOC Actor Hospitalized : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंह याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेमध्ये रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंह याची तब्येत बिघडली आहे. अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. अभिनेता गुरुचरण सिंह सध्या रुग्णालयात भरती असून त्याने इंस्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.
'तारक मेहता'मधील रोशन सिंह सोढीची तब्येत बिघडली
'तारक मेहता' टीव्ही शोमध्ये रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंहची तब्येत बिघडली आहे. अभिनेता गुरुचरण सिंहने हॉस्पिटलच्या बेडवरून एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये गुरुचरण सिंह पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. त्याने आपले डोके ब्लँकेटने झाकलं आहे आणि त्याच्या हाताला सलाईन लावलेली आहे. व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की, परिस्थिती खूपच वाईट आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "धन धन साहेब सिरी गुरु गोविंद सिंग महाराज जी, गुरुपूरबच्या खूप खूप शुभेच्छा."
गुरुचरण सिंहने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
गुरुचरण सिंहने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, "धन धन साहेब श्री गुरू गोबिंद सिंह महाराज जी, लाख लाख कोटी शुभेच्छा. काल गुरुपुराब आणि गुरू साहेबजींनी मला नवीन जीवन दिलं आहे. तुमच्या सर्वांच्या आणि गुरु गोविंद साहेबांच्या कृपेमुळे मी आज जिवंत आहे. तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद."
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
गुरुचरण सिंहला या अवस्थेत पाहून चाहते प्रचंड नाराज झाले. एका यूजरने लिहिले की, "पाजी, तुम्हाला काय झालं आहे? लवकर बरे व्हा." आणखी एका युजरने लिहिले की, "आमच्या सोढीची तब्येत कशी बिघडू शकते? तो म्हणजे लोखंडासारखा कडक आहे." दुसऱ्या युजरने लिहिले की, "सोढी भाई लवकर बरे व्हा." गुरुचरण सिंह एप्रिल 2024 मध्ये चर्चेत आला होता. ते अचानक बेपत्ता झाल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर तो मे महिन्यात दिल्लीतील घरी परतला. नंतर त्याने खुलासा केला होता की, आध्यात्मिक प्रवासाला निघाला आहे.
गुरुचरण सिंहचा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :