(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : 'तारक मेहता का..' मधील सोढीचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती, बँक खात्यातील व्यवहार रडारवर; पाहा व्हिडीओ
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिसांना गुरुचरण सिंह यांचे सीसीटीव्ही फूटेज हाती लागले आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिसांना गुरुचरण सिंह यांचे सीसीटीव्ही फूटेज हाती लागले आहे. त्या आधाराने त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय, सिंह यांच्या बँक व्यवहारावरही पोलिसांनी आपले लक्ष वळवले आहे.
दिल्ली पोलिसांनी आयपीसीतील कलम 365 नुसार एफआयआर दाखल केला आहे. 50 वर्षीय गुरुचरण सिंह हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरचरण सिंग बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पोलिसांनी आपला मुलगा शोधून काढण्याची ग्वाही दिल्यानंतरही वडील हरगीत सिंग देखील चिंतेत आहेत.
बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार...
गुरचरण सिंह बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फूटेज लागले आहे. त्याशिवाय, सिंह यांच्या बँक खात्याच्या तपशीलाचे व्यवहारही तपासण्यात आले आहे. पोलिसांना बँक खात्यातील हे व्यवहार संशयास्पद वाटत आहेत. या अँगलनेही पोलिसांनी तपास सुरू केला असून अपहरण झाले की आणखी काही घटना घडली याचा तपास सुरू आहे.
गुरुचरण सिंह यांनी शेवटचा मेसेज कोणाला केलेला?
गुरुचरण सिंह हे 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी घरातून निघाले होते. दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईकरीता विमान होते. मात्र, गुरुचरण सिंह हे मुंबईला पोहचलेच नाही. इतकंच नाही तर ते दिल्लीतील आपल्या घरीदेखील परतले नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह हे विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, चक्रावून सोडणारी गोष्ट म्हणजे विमानात बसण्याआधी गुरुचरण सिंह यांनी आपण विमानात बसत असल्याचे सांगितले. मग, आता गुरुचरण सिंह नेमके गेले कुठं असा प्रश्न निर्माण झाला आहे.