Spruha Joshi Serial Update : 'चला हवा येऊ द्या'मधील 'ही' अभिनेत्री झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत, छोट्या लेकाचीही होणार दमदार एन्ट्री
Spruha Joshi Serial Update : कलर्स मराठीवर लवकरच स्पृहा जोशी आणि सागर देशमुख मुख्य भूमिकेत असलेली सुख कळले ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत एक अभिनेत्री तिच्या लेकासह झळकणार आहे.
![Spruha Joshi Serial Update : 'चला हवा येऊ द्या'मधील 'ही' अभिनेत्री झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत, छोट्या लेकाचीही होणार दमदार एन्ट्री Swati Devel From Chala Hawa Yeu Dya Serial will show up in Spruha Joshi new Marathi Serial with her Son Aradhya Deval Spruha Joshi Serial Update : 'चला हवा येऊ द्या'मधील 'ही' अभिनेत्री झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत, छोट्या लेकाचीही होणार दमदार एन्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/31/f9ba82b3bf8e471d7947eec66a0c4b701711851486574720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Spruha Joshi Serial Update : सध्या वाहिनींवर सुरु असलेल्या नव्या मालिकांच्या ओघांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवरही एक नवी मालिका सुरु होत आहे. स्पृहा जोशी (Spruha Joshi) आणि सागर देशमुख (Sagar Deshmukh) हे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या 22 एप्रिलपासून 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आरपीच्या यादीत मागे पडलेल्या कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीने आता कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी या मालिका सुरु झाली होती.
दरम्यान या मालिकेत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एक अभिनेत्री झळकणार आहे. इतकच नव्हे तर या मालिकेत तिच्या लेकाची देखील एन्ट्री होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंवरुन ही माहिती दिली. अभिनेता सागर देशमुख ही या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तर, स्पृहा जोशी जवळपास वर्षभरात पुन्हा मालिकेत झळकणार आहे. सागर देशमुख, स्पृहा जोशीसोबत मिमी खडसे ही बालकलाकारदेखील झळकणार आहे.
'ही' अभिनेत्री झळकणार स्पृहा जोशीसोबत
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्या कार्यक्रमातील संगीताची जबाबदारी सांभाळणारा तुषार देवलही घराघरात पोहचला. त्याची बायको स्वाती देवल ही देखील बऱ्याचदा या कार्यक्रमात दिसली होती. तसेच त्यांचा लेक आराध्य देखील या कार्यक्रमात झळकला होता. स्वाती आता तिचा लेक आराध्यसह सुख कळले या मालिकेत झळकणार आहे. स्वातीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली. तिनं म्हटलं की, 'नवीन टीम, नवीन भूमिका,नवीन सुरुवात. पुन्हा एकदा येते आहे नव्या नावाने आणि तेही माझ्या स्वराध्यच्या बरोबरीने भेटायला.'
View this post on Instagram
'इंद्रायणी' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला...
दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही नवी मालिका सुरू होणार आहे. येत्या 25 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सायंकाळी 7 वाजता ही मालिका प्रसारीत होते. मालिकेत संदीप पाठक, अनिता दाते यांच्यासह सांची भोईर या बालकलाकाराची मुख्य भूमिका आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)