एक्स्प्लोर

Suraj Chavan : 'घोडा लावायचा नाही रे...,' गुलिगत सूरजच्या लग्नाचं छोटा पुढारीला टेन्शन; करवला व्हायचीही तयारी  

Suraj Chavan :  सूरज चव्हाणच्या लग्नाचं आता छोटा पुढारीला टेन्शन आलं असून छोटा पुढारी करवला व्हायलाही तयार झालाय. 

Suraj Chavan :  'बिग बॉस मराठी'चे (Bigg Boss Marathi New Season) नवे पर्व चांगलेच गाजाताना आपल्याला दिसत आहे. या नव्या पर्वावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. तसेच बिग बॉसच्या घरात सदस्स एकमेकांवर प्रेम ही करतात आणि टास्कमध्ये एकमेकांविरोधत उभे देखील राहतात. पण टास्क नसताना त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा देखील होते. 

बिग बॉसच्या घरात सध्या सूरजच्या लग्नाची चर्चा सुरु झालीये. इतकच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सूरजनेही त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. त्यामुळे आता बिग बॉसचे सदस्यही सूरजच्या लग्नाची तयारी करणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. 

सूरजच्या लग्नासाठी छोटा पुढारीचा उत्साह

आजच्या भागात गार्डन एरियात सुरज आणि घनश्याम यांच्यामध्ये सुरजच्या लग्नाची चर्चा होत आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. घनश्याम सुरजला म्हणतोय की, " तूझ्या लग्नात करवला नको का? मग मी आहे ना.. मग तूझ्या लग्नात आपल्याला तूझ्या आवडीचे कपडे घ्यायला लागणार. आम्हाला वहिनी पाहिजे बाबा.. मेकअप करायला.. आम्हाला हक्काची वहिनी हवी आहे. तुला एवढे शॉपिंगचे समजत नाही आमची वहिनी आम्हाला सांगेल भाऊजी ही बूटे घ्या. तुझ लग्न एकदम दणक्यात करायचे. डिजे लावायचा, घोडा लावायचा... त्यावर सुरज म्हणतो, "घोडा लावायचा नाही.. घोडा नाचवायचा रे."

 नंतर घनश्याम म्हणतो ,"अरे घोडा असा आणायचा त्यावर तू बसायचे. घोडा असा मस्त नाचनारा असला पाहिजे..फक्त तुला पाडले नाही पाहिजे. सगळा खर्च आपण करू. नवरीकडच्या लोकांनी खर्च नाही केला तरी चालेले आणि सगळ्यांत महत्वाचे वहिनी आम्ही ठरवणार तू नाही ठरवायची. आम्ही बघू आम्हाला वहिनी कशी हवी ते. " घनश्याम सुरजला विचारतो की, "तुझ्या लग्नात मी किती दिवस आधी येऊ?" त्यावर सूरज म्हणतो, " एक महिना आधी ये तू. घालू मस्त राडा आपण. " 

सूरजने सांगितली लव्हस्टोरी

 गार्डन एरियात पॅडी, सुरज ,अभिजित, आर्या आणि अंकिता हे बोलताना दिसत आहे. सुरज बाकीच्या सदस्यांना त्याच्या मूव्हीच्या शूटिंग दरम्यान झालेली गंमत सांगत आहे. सुरज सांगतोय की ," मी  एकदा शूटिंग करत असताना मला शूटींगच्या वेळी एक मुलगी आवडली होती. वाईच्या इथे आम्ही रूम बुक केली आणि आम्ही त्या रूममध्ये राहिलो. मी तिला पाहण्यासाठी सारखा रुमच्या बाहेर येत होतो. ती पण बाहेर येऊन मला पाहात होती. त्यानंतर पॅडी म्हणाले की " तुला कसे माहिती की, ती तुला बघून लाइन देत होती ?" 

त्यावर सुरज म्हणाला की , आम्ही फक्त एकमेकांकडे पाहायचो. मग मी तिला सांगितले की, तू मला खूप आवडते. पण हा सीन मधला डायलॉग होता. मला तिला प्रपोझ हाणायचा होता. मला तिच्या हातामध्ये गुलाब दयायचे होते. मी तिला म्हणालो तू माझ्यसाठी लई  स्पेशल आहेस. हे घे स्पेशल चॉकलेट. माझा बच्चा.. " त्यावर पॅडी यांनी विचारले की, "तू असे लाडात येऊन बोललास त्यावर तिचे काय उत्तर होते." यावर सुरज म्हणाला, " ती म्हणाली मला दुसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चूर चूर तुकडे झाले." यावर अंकिता म्हणाली की " तुझ्या दिलाचे किती तुकडे झाले असतील मोजता येणार नाही."  

ही बातमी वाचा : 

Ranveer Singh- Deepika Padukone : नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आईबाबा सज्ज, रणवीर-दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget