एक्स्प्लोर
...म्हणून सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार!
नवी दिल्ली : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादानंतर सुनील ग्रोव्हरने छोट्या पडद्यापासून लांबच राहणं पसंत केलं होतं. पण लवकरच तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, याबाबत सुनील ग्रोव्हरनेच स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे आपण केवळ सलमानसाठीच्या स्पेशल शोसाठीच परतणार असल्याचं, त्यानं सांगितलंय.
डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, सुनील गोव्हर छोट्या पडद्यावर परतण्याच्या विषयी द्विधा मन:स्थितीत होता. विशेष म्हणजे, सलमान खानलाही दुखवायचं नव्हतं. त्यामुळे सोनी टीव्हीने कपिल शर्माच्या शो व्यतिरीक्त सुनीलसाठी या नव्या शोचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत सुनील सांगतो की, ''मी सोनी टीव्हीवर एका विशेष पाहुण्यासाठी, सलमान खानसाठी परत येणार आहे. हा एक स्पेशल शो असेल, सलमानच्या आगामी ट्यूबलाईट सिनेमाचं प्रमोशनसाठी हा शो शूट करण्यात आला आहे.''
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुनील ग्रोव्हरचे कार्यक्रम सुरुच आहेत. कॅमेरापासून दूर असलेल्या सुनीलचं यावर म्हणणं आहे की, आपण काही काळानंतरच कॅमेरासमोर येऊ.
सध्या सलमानसाठीच्या 'सुपर नाईट विथ ट्यूबलाईट' या विशेष कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा अॅपिसोड लवकरच प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement