एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kon Honar Crorepati : संदीप वासलेकर खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; होणार असामान्य व्यक्तीची भेट

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात संदीप वासलेकर सहभागी होणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे, त्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळते. तर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो. या शनिवारच्या कर्मवीर विशेष भागात आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे व्यक्तिमत्त्व असणारे संदीप वासलेकर (Sundeep Waslekar) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुणे येथील अनुताई वाघ यांनी स्थापन केलेल्या 'ग्राममंगल' या संस्थांसाठी संदीप वासलेकर यांनी हा खेळ खेळला. यावेळी संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. 

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत कर्मवीर सुधा मूर्ती, अधिक कदम या भागांमध्ये सहभागी झाले होते. या आठवड्यातील कर्मवीर भागात संदीप वासलेकर उपस्थित राहणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

देशादेशांमधले तंटे सोडवणं, शांततेच्या मार्गाने त्यांच्यात समेट घडवून आणणं, अधिक चांगली राज्यपद्धती चालावी यासाठी विविध संशोधन करणं, सल्लासमलत करणं, भविष्यात अधिक प्रगल्भतेकडे जाणारी शासनपद्धती निर्माण करण्यास मदत व सल्ला देणं असं महान कार्य करणारे संदीप वासलेकर यांच्या विचारांनी हा भाग निश्चितच ज्ञान देणारा ठरणार आहे. 'जिथे नेता होतो मोठा तो देश छोटा आणि जिथे नेता-नागरिक समान तो देश होतो महान' असे मत संदीप वासलेकर यांनी या कर्मवीर विशेष भागात मांडले आहे. तर रमेश पानसे यांनी 'ग्राममंगल' या संस्थेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

'विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी त्यांना मुक्तपणे जगू द्या. मुलांची झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्या.',असा सल्ला रमेश पानसे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिला. देशादेशांमधील अनेक घडामोडी, माणसांच्या विविध गंमतीजंमती, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास असे अनेक महत्त्वाचे विषय या भागात बोलले गेल्याने हा भाग निश्चितच ज्ञान आणि मनोरंजनाचा मेळ साधलेला असणार आहे. 

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget