Star Pravah : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये रक्षाबंधनचा उत्साह; कलाकारांनी साजरा केला सण
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
![Star Pravah : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये रक्षाबंधनचा उत्साह; कलाकारांनी साजरा केला सण Star Pravah serial stars celebrate Raksha Bandhan Star Pravah : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये रक्षाबंधनचा उत्साह; कलाकारांनी साजरा केला सण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/e15195a7a90902f3671e02abf54d6f171660210544887259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Star Pravah : बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या खास दिवशी खरतर बहिण भावाला राखी बांधते मात्र ठिपक्यांची रांगोळी मालिकेत मात्र आगळं वेगळं रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. अप्पूला भाऊ नाही म्हणून ती उदास आहे. मात्र संपूर्ण कानेटकर कुटुंब एकत्र येऊन अप्पूला राखी बांधणार आहे. एकत्र कुटुंबाचं महत्त्व या विशेष भागाच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.
रंग माझा वेगळामध्येही यंदा दीपिका कार्तिकीला राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करणार आहे. या दोघी जरी सख्या बहिणी असल्या तरी याची कल्पना दोघींनाही नाही. या दोघींची मैत्री मात्र घट्ट आहे. याच मैत्रीच्या नात्याने दीपिका कार्तिकीला राखी बांधणार आहे. दीपिका आणि कार्तिकी प्रमाणेच पिहू आणि स्वरा देखिल बहिणी आहेत. मात्र स्वराने आपली ओळख लपवल्यानंतर स्वराज म्हणूनच ती घरात वावरते. यंदाच्या राखीपौर्णिमेला पिहू स्वराजलाच भाऊ मानत त्याला राखी बांधणार आहे.
रंग माझा वेगळा आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतलं हे रक्षाबंधन निरागस प्रेमाची साक्ष देणारं आहे. पिकींचा विजय असो मालिकेत पिंकी लग्नानंतरची पहिली राखीपौर्णिमा साजरी करणार आहे. पिंकी आणि तिचा भाऊ दिप्याचं नातं आपल्या परिचयाचं आहेच. लाडक्या बहिणीला नेहमी साथ देणारा दिप्या पिंकीला रक्षाबंधनाला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता नक्कीच आहे. तेव्हा पाहायला विसरू नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे रक्षाबंधन विशेष भाग.
'तू चाल पुढं' मालिकेतील दिपा म्हणाली...
अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही बऱ्याच कालावधी नंतर 'तू चाल पुढं' या नव्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की, आमचे नाते खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझे काम त्याला खूप आवडते. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो. या वर्षी देखील तेवढ्याच आनंदाने आणि उत्सहाने आम्ही रक्षाबंधन साजरे करणार आहोत असं सांगताना दिपा खुप आनंदी झाली होती.
वाचा इतर बातम्या :
- Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' परत येतेय; 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
- Raksha Bandhan 2022 : मराठी अभिनेत्रींनी भावासोबतच्या गोड आठवणींना दिला उजाळा; भावना व्यक्त करत म्हणाल्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)