एक्स्प्लोर

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिका बंद; क्रू, कलाकारांना धक्का

सोमवारी या मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे.

मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त 'पहरेदार पिया की' ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

मालिका अचानक बंद झाल्याने मालिकेची कलाकार आणि क्रू यांना धक्का बसला आहे. मालिकेत लीप दाखवला जाईल असा विचार त्यांनी केला होता. परंतु मालिकाच बंद झाल्याने सगळ्यांना झटका बसला आहे. सोमवारी या मालिकेच्या सेटवर शांतता होती. त्यामुळे सरकारने या मालिकेवर बंदी घालण्याचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका वर्तवली जात आहे. या मालिकेत 12 वर्षांचा लीप येईल, असं वृत्त दोन दिवसांपूर्वी होतं. या लीपनंतर 9 वर्षांचा मुलगा 21 वर्षाचा होईल, जेणेकरुन 'बालविवाह'चा आक्षेप आपोआपच निघून जाईल. परंतु ताज्या माहितीनुसार, मालिकेचं चित्रीकरण थांबलं आहे.

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' मालिकेविरोधात अखेर कारवाई

‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे सुरुवातीपासूनच वादात अडकली आहे. एका 18 वर्षांच्या तरुणीचं 9 वर्षांच्या मुलासोबत लग्न होतं. नुकत्याच झालेल्या काही एपिसोडमध्ये सुहागरात तसंच कुंकू लावण्याचे सीन दाखवले होते. यावर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. ‘पहरेदार पिया की’ मालिकेविषयी रोष निर्माण झाल्याने मानसी जैन नावाच्या एका तरुणीने change.org वेबसाईटवर याचिका दाखल केली होती. ही मालिका तातडीने बंद करा अशी मागणी या याचिकेद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर स्मृती इराणी यांनी मागणीचा विचार करत ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट्स काऊन्सिलकडे हे प्रकरण सोपवून बीसीसीसीला या मालिकेवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला होता. स्मृती इराणींची ‘पहरेदार पिया की’विरोधात कारवाई, मालिका बंद होणार? बीसीसीसीने सोनी वाहिनीला मालिकेची वेळ बदलण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता ही मालिका रात्री 8.30 ऐवजी रात्री 10.30 वाजता प्रसारित होत होती. याशिवाय मालिका सुरु असताना ‘ही मालिका बालविवाहाला प्रोत्साहन देत नाही’, अशा आशयाची पट्टी चालवावी, असे निर्देशही देण्यात आले होते. आता ही मालिकाच बंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget