एक्स्प्लोर
'बिग बॉस 11'साठी ढिंच्यॅक पूजाची 80 लाखांची मागणी?
ढिंच्यॅक पूजाची 'सेल्फी मैने ले ली आज', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर', 'बापू दे दे थोडा कॅश' यासारखी गाणी इंटरनेटवर व्ह्यूज खेचत आहेत. त्यामुळे पूजाने आपली किंमत वाढवून घेतली
!['बिग बॉस 11'साठी ढिंच्यॅक पूजाची 80 लाखांची मागणी? Social Media Queen Dhinchak Pooja Asked For 80 Lacs To Participate In Bigg Boss 11 Latest Update 'बिग बॉस 11'साठी ढिंच्यॅक पूजाची 80 लाखांची मागणी?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/29102701/Dhinchak-Pooja.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'बिग बॉस'चा 11 वा सिझन येत्या एक ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी सोशल मीडिया क्वीन ढिंच्यॅक पूजाला आमंत्रण मिळालं होतं. मात्र तिने त्यासाठी 80 लाख रुपये मागितल्याची चर्चा आहे.
बिग बॉस या रिअॅलिटी शोचं प्रत्येक पर्व शो सुरु होण्याआधीपासूनच गाजत असतं. प्रत्यक्ष शो सुरु झाल्यानंतर होणाऱ्या काँट्रोव्हर्सीज तर वेगळ्याच. कोणकोणत्या सेलिब्रेटींना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार, याबाबत चाहते अटकळ बांधत असतात. यावेळी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ढिंच्यॅक पूजाला शोमध्ये सहभागाचं आमंत्रण होतं.
ढिंच्यॅक पूजाची 'सेल्फी मैने ले ली आज', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर', 'बापू दे दे थोडा कॅश' यासारखी गाणी इंटरनेटवर व्ह्यूज खेचत आहेत. त्यामुळे पूजाने आपली किंमत वाढवून घेतली. ढिंच्यॅक पूजाची लोकप्रियता पाहून तिने केलेल्या 80 लाखांच्या मागणीवर निर्मात्यांनी विचारही केला. मात्र मानधनावरुन बोलणी फिस्कटल्यामुळे पूजाने नकार कळवला आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच यावेळीही बिग बॉसचं सूत्रसंचालन करणार आहे. या शोमध्ये अभिनेता गौरव गेरा हा पहिला 'पडोसी' असेल, अशी घोषणा निर्मात्यांनी केली होती. त्यानंतर शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)