Sheezan Khan : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करायला शीझान खान सज्ज! रोहित शेट्टीच्या शोमध्ये होणार सहभागी
Sheezan Khan : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) माध्यमातून शिझान खान छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
Sheezan Khan In Khatron Ke Khiladi 13 : शीझान खान (Sheezan Khan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'अली बाबा : दास्तान ए काबुल' (Ali Baba : Dastan E Kabul) या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. शीझान 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) शेवटचा दिसला होता.
शीझान खान रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे. त्याच्यावर खलटा सुरू असल्याने तो भारताबाहेर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल करत भारताबाहेर प्रवास करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
'खतरों के खिलाडी 13'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? (Khatron Ke Khiladi 13 Contestants List)
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगसाठी अर्जेंटिनाला रवाना होतील. नायरा बॅनर्जी, अर्चना गौतम, शिव ठाकरे, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, अंजली आनंद, शरद मल्होत्रा, मुनावर फारुकी, प्रिन्स नरुला आणि अंजली अरोरा हे स्पर्धक 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणार आहेत.
शिझान खान कोण आहे? (Who Is Sheezan Khan)
शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. शिझान हा अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची गोडी लागल्याने त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
View this post on Instagram
शीझानने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे, तो मुंबई विद्यापीठातून त्याने शिक्षण घेतलं आहे. अभिनयाव्यतिरिक्त शीजानला बॉडीबिल्डिंगची आवड आहे. शिझान अनेकदा त्याच्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. 'खतरों के खिलाडी 13' शीझान खान कसा खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लवकरच 'खतरों के खिलाडी'च्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
संबंधित बातम्या