Sharmishtha Raut: शर्मिष्ठासाठी तेजस गिरगाव सोडून ठाण्याला झाला शिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा
‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
Sharmishtha Raut: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शर्मिष्ठाची ‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या मालिकेत दोन बहिणींचे नाते दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी आदेश बांदेकर यांनी या कलाकारांनी विविध प्रश्न विचारले.
नुकताच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आदेश बांदेकर हे शर्मिष्ठाला प्रश्न विचारतात. ते म्हणतात, तुला सगळं ठाण्यातच मिळालं?. यावर शर्मिष्ठा 'हो' म्हणते. त्यानंतर आदेश बांदेकर विचारतात, 'कसं काय पण?' यावर शर्मिष्ठा म्हणते, 'माझा नवरा गिरगावचा आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं. तेव्हा माझी अट होती की, मी ठाणे सोडणार नाही. यावर तो म्हणाला होता, नो प्रॉब्लेम मी, ठाण्यात येतो. मग तो गिरगाव सोडून ठाण्यात होता.'
शर्मिष्ठानं 2020 मध्ये तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शर्मिष्ठा ही तेजससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
View this post on Instagram
शर्मिष्ठानं हे मन बावरे , अबोली , जुळून येती रेशीमगाठी या मालिकांमध्ये काम केलं. तसेच तिनं चि व चि सौ का, रंगकर्मी आणि योद्धा या चित्रपटांमध्ये काम केले. चि व चि सौ का, रंगकर्मी आणि योद्धा या चित्रपटांमध्ये शर्मिष्ठानं महत्वाची भूमिका साकारली आहे. आता शर्मिष्ठाच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अंतर आलं तरी तुटत नाहीत रक्तांची नाती, असं कॅप्शन त्या प्रोमोला देण्यात आलं होतंय.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: